AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?

| Updated on: Jul 17, 2026 | 10:54 AM
Share

राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीला रवाना होणार होते.

राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीला रवाना होणार होते. त्यानंतर आज सकाळीही त्यांचा दिल्ली दौरा नियोजित होता. मात्र, दोन्ही वेळा हा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे या अचानक झालेल्या बदलामागील कारणांबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नंदनवन येथे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबत ते महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याचेही समजते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर महायुतीच्या पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द होणे, वरिष्ठ नेत्यांसोबत होणाऱ्या बैठका आणि पुढील राजकीय निर्णय याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 17, 2026 10:54 AM

Follow Us