AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कथा, कल्पना माझी अन् क्रेडिट मात्र..; परेश रावल यांचे अक्षय कुमारवर थेट आरोप

दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी 'ओह माय गॉड 2' या चित्रपटावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अक्षय कुमारवर थेट आरोप केले. कथा आणि संकल्पना माझी असतानाही मला श्रेयच दिलं नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

कथा, कल्पना माझी अन् क्रेडिट मात्र..; परेश रावल यांचे अक्षय कुमारवर थेट आरोप
Paresh Rawal and Akshay Kumar Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2026 | 11:02 AM
Share

तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये ‘OMG 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा सेन्सॉर बोर्डासोबत याचा मोठा वाद झाला होता. या चित्रपटात लैंगिक शिक्षणासोबत धार्मिक विषय मिसळल्यावरून आक्षेप नोंदवण्यात आला होता. यावर बंदी आणण्याचीही मागणी केली जात होती. अखेर काही बदलांनंतर ‘अ’ प्रमाणपत्रासह हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी यावरून मोठा खुलासा केला आहे. ‘OMG 2’ या चित्रपटाची मूळ कल्पना माझीच होती, पण अक्षय कुमारने माझ्याकडून स्क्रिप्ट घेतली आणि मला श्रेयसुद्धा दिलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

OMG 2 ची संकल्पना

‘विकी लालवानी’ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी दावा केला की, त्यांनी या चित्रपटाच्या मूळ कथेबद्दल विचार केला होता, जो नंतर ‘OMG 2’ बनून थिएटरमध्ये आला. त्यांनी मूळ कल्पना दिग्दर्शक अमित राय यांना सांगितली होती आणि त्यांच्यासोबत मिळून पटकथा बनवली होती. मात्र नंतर जेव्हा अक्षय कुमार त्या प्रोजेक्टशी जोडला गेला, तेव्हा कथेच बरेच बदल करण्यात आले. याविषयी परेश रावल म्हणाले, “मी ‘रोड टू संगम’चे दिग्दर्शक अमित राय यांच्याशी संपर्क साधला आणि ते एखादा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत का, असं विचारलं. मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे एक कल्पना आहे. आपण दोघं बसून काहीतरी लिहुयात. मी त्यांना स्पष्ट केलं की, मी लेखक तर नाहीये, पण मी कल्पना चांगली देऊ शकतो. आपण कुठे चुकतोय हे ओळखण्यासाठी मी मदत करू शकतो. कारण मला स्क्रिनप्लेची थोडीफार समज आहे.”

अजय देवगण, सलमानशी संपर्क..

“मूळ संकल्पना हा चित्रपटापेक्षा खूप वेगळा होता. आमची मुख्य कल्पना हीच होती की मुलाच्या वडिलांना मार्ग दाखवणारा एखादा बाइकर असावा, देव नाही. पहिल्या ‘ओह माय गॉड’मध्ये देव यासाठी आले होते, कारण खटलाच देवाविरोधात होता. मात्र हा चित्रपट एका वडिलांचा त्यांच्या मुलाला न्याय मिळवून देण्याबाबत होता. यात कोणत्याच दैवी भूमिकेची गरज नव्हती. मी बाइकरच्या भूमिकेसाठी अजय देवगण आणि सलमान खान यांच्याशीही संपर्क साधला होता. मी अक्षयशी संपर्क साधला नव्हता, कारण मग लोकांना तो ‘OMG 2’ वाटला असता आणि आमचा तसा प्लॅनच नव्हता. काही दिवसांनंतर अमित राय यांनी मला फोन करून सांगितलं की अक्षयला हा चित्रपट करायचा आहे. इथे समस्या अशी होती की, अमितने स्क्रिप्टवर तात्पुरतं OMG 2 असं शीर्षक लिहिलं होतं, कारण जॉनर एकसारखाच होता. मी त्यांना म्हटलं की मला ही कथा पुढे न्यायची नाही. मी त्याच्याशी भांडू शकत नाही, कारण तो माझा मित्र आहे.. असं मी स्पष्ट दिग्दर्शकांना सांगितलं होतं” असा खुलासा परेश रावल यांनी केला.

देव कुठेच नव्हता..

परेश रावल त्यांच्या संकल्पनेवर ठाम होते, कारण त्यांना ‘ओह माय गॉड’चा सीक्वेल बनवायचा नव्हता, त्यांच्या कथेत कुठेच देवाचा सहभाग नव्हता. तरी त्यांना न जुमानता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक पुढे काम करू लागले. अखेर परेश रावल यांनीच त्यातून माघार घेतली. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “मी नंतर जेव्हा अक्षय कुमारशी बोललो, तेव्हा त्याने मला चित्रपटावर काम करण्यास सांगितलं होतं. पण मी थेट नकार दिला. कारण हा तो चित्रपट नव्हता, ज्याची मी कल्पना केली होती. माझ्या कथेत कुठेच देवाची भूमिका नव्हती. त्याने माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, पण मला मी सुरुवातीपासूनच त्या कथेशी जोडलेला होतो. ती कथा कशी हवी, याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी त्यातून बाहेर पडलो.”

श्रेयचं दिलं नाही

सर्वांत दु:खद गोष्ट ही आहे की मला कथा किंवा संकल्पनेचं कोणतंच श्रेय देण्यात आलं नव्हतं, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. “अमित राय, अक्षय कुमार, अश्विन, अजय देवगण, करण जोहर, सलमान खान.. सर्वांना माहित होतं की ही माझी कल्पना आणि कथा आहे. अजय आणि सलमानने कदाचित विषयामुळे नकार दिला असावा. त्यांना वाटलं असेल की हे वादग्रस्त ठरू शकतं”, असं परेश रावल यांनी सांगितलं.

‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता आणि देशभरात त्याची कमाई 150.75 कोटी रुपयांची झाली होती. जगभरातील कलेक्शनचा आकडा 221.6 कोटींवर पोहोचला होता.

Follow Us
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जरे ते आठवलेंना….

Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जरे ते आठवलेंना…

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले...

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले..

महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क.

महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?.

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?

पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?.

पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?