AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akash Ambani Reliance JIO CEO: रिलायसन्स समुहात खांदेपालट; जिओची धुरा आकाश अंबानीच्या हाती तर ईशा अंबानी रिलायन्स रिटेलची अध्यक्ष

Akash Ambani Profile: देशातील सर्वात मोठ्या रिलायन्स ग्रुपमध्ये खांदेपालट करण्यात आलं आहे. नवीन पिढीकडे आता व्यवसायाची सूत्रं देण्यात आली आहे. जिओचे नेतृत्व आता आकाश अंबानी करतील. तर रिलायन्स रिटलेची धुरा ईशा अंबानी यांच्याकडे असेल. जिओचे संचालक मुकेश अंबानी यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.

Akash Ambani Reliance JIO CEO: रिलायसन्स समुहात खांदेपालट; जिओची धुरा आकाश अंबानीच्या हाती तर ईशा अंबानी रिलायन्स रिटेलची अध्यक्ष
रिलायन्सची धुरा नवीन पिढीकडे Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 29, 2022 | 6:17 PM
Share

Reliance JIO New CEO: खांदेपालट ही सर्वच क्षेत्रात होते. प्रत्येक जण त्यांचा वारस नेमतो. त्याला रिलायन्स ही अपवाद नाही. देशातील देशातील सर्वात मोठ्या रिलायन्स ग्रुपमध्ये (Reliance Group) खांदेपालट करण्यात आलं आहे. नवीन पिढीकडे आता व्यवसायाची सूत्रं देण्यात आली आहे. जिओचे संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी रिलायन्स जिओच्या टेलिकॉम युनिट बोर्डाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. रिलायन्स समुहाचा पसारा तेलापासून ते टेलिकॉम कंपन्यांपर्यंत पसरला आहे. या समुहाच्या रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आणि रिलायन्स जिओ (Reliance JIO) या दोन उपकंपन्या आहेत. 217 अब्ज डॉलरची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries ltd) ही प्रमुख कंपनी आहे. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्यानंतर जिओचे नेतृत्व आता आकाश अंबानी (Akash Ambani) करतील. तर रिलायन्स रिटलेची धुरा ईशा अंबानी (Isha Ambani) यांच्याकडे येण्याची शक्यता  आहे.

स्टॉक एक्सचेंजला माहिती

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने या खांदेपालटाची माहिती मंगळवारी स्टॉक एक्सचेंजला दिली. 27 जून रोजी बाजार बंद होताच मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करुन घेतले. त्यानंतर कंपनीने आकाश अंबानी यांना बोर्डाचे संचालक बनवण्याची माहितीही दिली. कंपनीच्या संचालक मंडळाने गैर-कार्यकारी संचालक (Non Executive Director) आकाश अंबानी यांची संचालकपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली. यासोबतच संचालक मंडळाने अतिरिक्त संचालक म्हणून रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांच्या नियुक्तीलाही मंजुरी दिली. या दोघांची 5 वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज मोहन पवार यांची नियुक्ती करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. आता समभागधारकांकडून या नियुक्त्यांना मंजुरी मिळवण्यात येईल.

ईशा अंबानीकडे रिटेल युनिट

रिलायन्स जिओच्या उत्तराधिका-याचा मुकेश अंबानी यांनी मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर निर्णय घेण्यात आला. त्यांचा मुलगा आकाश याच्याकडे या उपकंपनीची जबाबदारी देण्यात आली. तर मुलगी ईशा यांची रिलायन्स इंडस्ट्रीजची दुसरी उपकंपनी रिलायन्स रिटेलच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची शक्यता आहे.  ईशा आणि आकाश दोघेही मेटा प्लॅटफॉर्म्स इंक या प्रकल्पाचे भागीदार आहेत. रिलायन्स जिओ ही सध्या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. या कंपनीने 20221-22 च्या चौथ्या तिमाहीत 4,171 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तर कंपनीचा महसूल 17,358 कोटी रुपयांवरून 20,901 कोटी रुपये म्हणजे 20.4 टक्क्यांनी वाढला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.