AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता WhatsApp मध्ये नवे ‘After Reading’ फिचर, प्रायव्हसीवर फोकस, काय आहेत डिटेल्स ?

WhatsApp वर लवकरच नवे 'After Reading' फिचर युजर्सचा भेटीला येणार आहे.ज्यामुळे युजर्सची गोपनियता आणखी वाढणार आहे. काय आहे या नवीन फिचर्समध्ये पाहूयात...

आता WhatsApp मध्ये नवे 'After Reading' फिचर, प्रायव्हसीवर फोकस, काय आहेत डिटेल्स ?
After Reading
| Updated on: Mar 23, 2026 | 4:14 PM
Share

WhatsApp लवकरच एक नवीन प्रायव्हसी फिचर्स घेऊन येऊ शकते. कंपनी युजर्सचा अनुभव चांगला बनण्यासाठी व्हाट्सअप एपमध्ये नव-नवे फिचर्स आणत असते. आता एका अशा फिचर्सवर काम करत आहे ज्यात मॅसेज मिळणारा रिसिव्हर जसा तुमचा मॅसेज वाचेल तसा तो आपोआप गायब होईल. या फिचर्सचे नाव आहे आफ्टर रिडींग फिचर. व्हाट्सअप डेव्हलमेंटवर नजर ठेवणारी वेबसाईट WABetaInfo ने या लेटेस्ट फिचरला Android बिटा व्हर्जनमध्ये पाहिले आहे. बातमीनुसार हे नवे टुल युजला चॅटवर जास्त नियंत्रण मिळवून देईल.

या फिचरच्या मागची आयडिया सिंपल आहे. एकदा ऑन झाल्यानंतर मॅसेज रिसिव्ह करणाऱ्याने मॅसेज वाचल्यानंतर हा मॅसेज आपोआप गायब होईल. बातमीनुसार मॅसेज उघडल्यानंतर WhatsApp १५ मिनिटांचा काऊंट डाऊन सुरु करेल आणि टायमर संपल्यानंतर हा मॅसेज पाठवणारा आणि मॅसेज मिळणारा दोघांच्या चॅटमधून हा मॅसेड डिलिट होईल. जर मॅसेज उघडलाच नाही तरी हा मॅसेज २४ तास राहिल आणि नंतर आपोआप गायब होऊन जाईल. हे फिचर Android व्हर्जन 2.26.12.2 साठी WhatsApp बिटा पाहिले गेले. मात्र, अजूनही डेव्हलपमेंट स्टेज आहे आणि बिटा टेस्टींगसाठी उपलब्ध नाही.

या यूजर्ससाठी महत्वाचे फिचर

हे नवीन फिचर त्या WhatsApp यूजर्ससाठी कामाचे ठरेल जे नेहमी OTP, पासवर्ड, एड्रेस वा व्हेरिफिकेशन कोड सारख्या कॉन्फिडेंशियल माहिती शेअर करत असतात. आता WhatsApp वर मॅसेज सर्वसाधारणपणे तो पर्यंत चॅटमध्ये असतात जोपर्यंत मॅन्युअली डिलिट करत नाही. वा डिसअपियरिंग मॅसेजचा वापर करुन पाठवला जात नाही. नव्या ऑटो – डिलीट सिस्टीमच्या मदतीने युजर्स असे टेक्स्ट पाठवू शकतो जे पाहिल्यानंतर स्वत:हून डिलीट होतील. ज्यामुळे चॅट हिस्ट्रीमध्ये प्रायव्हेट डिटेल्स राहून जाण्याचा चान्स कमी होऊन जाईल.

WABetaInfo ने सांगितले की WhatsApp वर नवा After reading फिचर तेव्हाही काम करेल जेव्हा रीड रिसीट बंद असेल. सर्वसाधारणपणे व्हाट्सअप मॅसेज वाचल्यानंतर ब्ल्यू टिक दिसते. परंतू काही युजर प्रायव्हसीसाठी या सेटिंगला बंद करतात. आता Disappearing Messages सोबत २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसांचा पर्याय मिळतो. परंतू हे नवीन फिचर्स आल्यानंतर १५ मिनिटांत मॅसेज गायब होईल. सध्या हे फिचर्स नेमके केव्हा रोल आऊट होईल हे सांगण्यात आलेले नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?