AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता X प्लॅटफॉर्मवर येतेय Google Pay सारखे फिचर, कुठेही आणि कधी करु शकता Payment

गेल्यावर्षी इलॉन मस्क यांनी ट्वीटर खरेदी केले. त्यानंतर त्याचे नामकरण एक्स झाले असले तरी त्यात भविष्यात ऑनलाईन पेमेंट करण्यासह अनेक महत्वाची फिचर येणार आहेत. पाहा कोणती फिचर आहेत ती ?

आता X प्लॅटफॉर्मवर येतेय Google Pay सारखे फिचर, कुठेही आणि कधी करु शकता Payment
elon musk xImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 22, 2023 | 8:48 PM
Share

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : इलोन मस्क ( Elon Musk ) यांच्या मालकीचा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्स X लवकरच गुगल पेला ( Google Pay ) टक्कर देणार आहे. लवकरच एक्स प्लॅटफॉर्मवर देखील पेमेंटची सुविधा मिळू शकणार आहे. एक्सची ( आधीचे ट्वीटर Twitter ) सीईओ लिंडा याकारीनो यांनी आपल्या अलिकडेच केलेल्या पोस्टमधून याबाबतची माहीती दिली आहे. त्यात त्यांनी एक्स लवकरच ऑडीओ, व्हिडीओ, मॅसेजिंग, पेमेंट आणि बॅंकींग सारखे अनेक फिचर्स युजरसाठी आणणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

एक्सच्या नवीन फिचरबाबत माहिती देताना याकारीनो यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक्सवर येणाऱ्या आगामी फिचरची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एक्सवर काय काय येणार आहे पाहा. हा व्हिडीओ दोन मिनिटांचा आहे. व्हिडीओमध्ये अनेक फिचर्सची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनूसार पेमेंट करण्याची सुविधा एक्सवर सुरु होणार आहे. याशिवाय एक्सवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा लवकरच सुरु होणार आहे. आतापर्यंत या एक्सवर केवळ टेक्स्ट मॅसेजद्वारे जोडले एकमेकांना संपर्क करता येत होता. परंतू आता व्हिडीओ कॉलिंगद्वारे एकमेकांशी संपर्क करता येणार आहे. तसेच पेमेंट करणे तसेच नोकरी शोधणे अशा अनेक सुविधा एक्सवर सुरु होणार आहेत.

Everything App बनणार का एक्स

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी मागे म्हटले होते की त्यांना एक असे एप तयार करायचे आहे ज्यात सर्व सुविधा एका जागी उपलब्ध असतील. त्यांनी अनेकदा Everything App बाबत सुतोवाच केले होते. जर सर्वकाही सुरळीत झाले तर एक्स असा प्लॅटफॉर्म होऊ शकतो. जेथे अनेक सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतील. मस्क यांनी गेल्यावर्षी ट्वीटरला खरेदी केले होते. त्यावेळी इलॉन मस्क यांना एक्स प्लॅटफॉर्मला एव्हरीथिंग एपसारखे वापरले जाऊ शकते याची कोणालाही कल्पना नव्हती.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा