कामाच्या मध्येच Internet गेलं? नो प्रॉब्लेम! ‘या’ टीप्स वाचा आणि Google Drive Offline वापरा

महत्त्वाची फाईल Google Drive मध्ये आहे आणि अचानक इंटरनेट गेलं? आता काम कसं करायचं, फाईल कशी बघायची, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? आपल्याला वाटतं Drive म्हणजे इंटरनेट हवंच! पण थांबा! तुमचं काम आता थांबणार नाही? Google Drive मध्येच लपली आहे एक अशी सोय, जी तुम्हाला इंटरनेट नसतानाही तुमच्या फाइल्स वापरू देते!

कामाच्या मध्येच Internet गेलं? नो प्रॉब्लेम! या टीप्स वाचा आणि Google Drive Offline वापरा
Google Drive
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 3:42 PM

कधी अचानक इंटरनेट गेलं आणि एखादं महत्त्वाचं डॉक्युमेंट ओपन करायचं होतं… मग काय? टेन्शनच! पण आता Google Drive वापरायला इंटरनेट लागेलच असं नाही! Google ने दिलेली ‘Offline Mode’ ही खास सोय तुमचं काम इंटरनेटशिवायही चालू ठेवू शकते आणि तीसुद्धा अगदी सोप्या स्टेप्समध्ये!

Google Drive चा Offline मोड वापरून तुम्ही Docs, Sheets, Slides यासारख्या फाईल्स पाहू शकता, एडिट करू शकता आणि त्या तुमच्या डिव्हाइसमध्ये तात्पुरत्या सेव्ह होतात. एकदा इंटरनेट परत आला, की त्या आपोआप Cloud वर Sync होतात.

ही फिचर वापरण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा

प्रथम इंटरनेट लागणार: Offline मोड सुरू करताना सुरुवातीला इंटरनेट आवश्यक आहे.

ब्राउझर आणि एक्सटेन्शनची गरज: कॉम्प्युटरवर वापरण्यासाठी Google Chrome किंवा Edge लागतो. सोबत ‘Google Docs Offline’ हे Extension इन्स्टॉल करावं लागतं.

मोबाईल अ‍ॅप अपडेट ठेवा: मोबाईल वापरकर्त्यांनी Google Drive अ‍ॅप अपडेटेड ठेवणं आवश्यक आहे.

डिव्हाइस स्पेस हवी: फाईल्स लोकली सेव्ह होतात, त्यामुळे फोन किंवा पीसीमध्ये थोडी मोकळी जागा असावी.

मोबाईलवर Offline मोड कसा सुरू कराल?

  • 1. Google Drive अ‍ॅप उघडा.
  • 2. मेनू उघडण्यासाठी डाव्या कोपऱ्यातील तीन रेषांवर टॅप करा.
  • 3. ‘Settings’ मध्ये जा.
  • 4. ‘Make recent files available offline’ हा पर्याय On करा.
  • 5. विशिष्ट फाईलसाठी, त्या फाईलशेजारील तीन टिंबांवर टॅप करून ‘Make available offline’ निवडा.

कॉम्प्युटरवर Offline मोड कसा Activate कराल?

  • 1. Chrome किंवा Edge मध्ये drive.google.com उघडा.
  • 2. वरच्या उजव्या कोपऱ्यातील सेटिंग्स आयकॉनवर क्लिक करा.
  • 3. ‘Settings’ → ‘Offline’ पर्याय निवडा.
  • 4. “Create, open, and edit…” असलेल्या बॉक्सवर टिक करा.
  • 5. ‘Save Changes’ वर क्लिक करा.