AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI च्या मदतीने WhatsApp वरील लांब मेसेजेस चुटकीत कसे वाचाल? जाणून घ्या सोप्या शब्दात

WhatsApp वर कंटाळवाणे लांब मेसेजेस? AI देईल त्याचा शॉर्टकट! कसा वापरायचा, वाचा सोप्या शब्दात!"

AI च्या मदतीने WhatsApp वरील लांब मेसेजेस चुटकीत कसे वाचाल? जाणून घ्या सोप्या शब्दात
whatsapp
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 13, 2025 | 2:44 PM
Share

व्हॉट्सॲप म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग! गुड मॉर्निंगच्या मेसेजपासून ते ऑफिसच्या महत्त्वाच्या चर्चांपर्यंत, सगळं काही व्हॉट्सॲपवरच चालतं. पण अनेकदा असं होतं की, एखाद्या ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चॅटमध्ये इतके मोठे मोठे, लांबलचक मेसेज येतात की ते पूर्ण वाचायचाच कंटाळा येतो. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, हे शोधायला खूप वेळ लागतो.

पण आता व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे! व्हॉट्सॲप लवकरच एक असं नवीन आणि जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे तुमची ही अडचन कायमची संपवू शकतं. त्या फिचरचं नाव आहे ‘Message Summary’

काय आहे हे ‘Message Summary’ फीचर?

WAbetainfo नुसार, व्हॉट्सॲप सध्या एका ‘Message Summary’ नावाच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर AI वापरून काम करेल. कसं काम करेल? जेव्हा तुम्हाला एखादा खूप मोठा मेसेज येईल, तेव्हा हे फीचर त्या मेसेजमधील महत्त्वाचे मुद्दे ओळखून त्याचा एक छोटा, संक्षिप्त सारांश तयार करेल. म्हणजे, तुम्हाला पूर्ण मेसेज न वाचताही त्यातील मुख्य गोष्ट काय आहे, हे लगेच समजेल.

कुठे उपलब्ध होणार हे फीचर ?

हे फीचर तुमच्या पर्सनल चॅट्स, ग्रुप चॅट्स आणि व्हॉट्सॲप चॅनल्समध्ये येणाऱ्या मेसेजसाठी काम करेल, असा अंदाज आहे.

उदाहरणार्थ : जर खूप सारे नवीन मेसेज आले असतील, तर Meta AI वापरून हे फीचर त्या सगळ्या नवीन मेसेजमधील महत्त्वाचे मुद्दे वेगळे काढून तुम्हाला दाखवेल. हे सगळं फक्त एका बटणाच्या क्लिकवर उपलब्ध होऊ शकतं!

या फिचरचे फायदे

या फीचरमुळे यूजर्सचा खूप वेळ वाचणार आहे. विशेषतः ज्यांना कामाच्या ग्रुप्समध्ये किंवा अनेक चॅट्समध्ये सतत मोठे मेसेज येत राहतात, त्यांच्यासाठी हे खूपच उपयोगी ठरेल. Information Overload कमी होईल आणि महत्त्वाचे मुद्दे पटकन लक्षात येतील.

व्हॉट्सॲप हे फीचर आणताना यूजर्सच्या Privacy ची पूर्ण काळजी घेईल, असं सांगितलं जात आहे. सध्या हे फीचर WhatsApp Android Beta Version 2.25.15.12 मध्ये टेस्टिंगसाठी उपलब्ध झालं आहे. याचा अर्थ, लवकरच ते सर्वसामान्य यूजर्ससाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...