
नवीन स्मार्टवॉच खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी NoiseFit Pro 6R हा स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलेला आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हा स्मार्टवॉच तुम्हाला विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. तर या स्मार्टवॉच मध्ये तुम्हाला लेदर स्ट्रॅप, मेटल स्ट्रॅप आणि सिलिकॉन स्ट्रॅप प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. हे स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमशी सुसंगत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा वॉच एकदा चार्ज केल्यावर 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते.
नॉईजफिट प्रो 6 आर ची भारतातील किंमत
भारतात नॉईजफिट स्मार्टवॉचची लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 6 हजार 999 रूपये आहे, तर मेटल स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 7 हजार 999 रूपये आहे. हे वॉच कंपनीच्या वेबसाइटवरून तसेच Amazon आणि Flipkart वरून खरेदी करता येईल.
लेदर स्ट्रॅप व्हेरिएंट तपकिरी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे, तर मेटल स्ट्रॅप पर्याय टायटॅनियम आणि क्रोम ब्लॅकमध्ये खरेदी करता येईल. सिलिकॉन स्ट्रॅप मॉडेल काळ्या आणि स्टारलाईट गोल्ड रंगात उपलब्ध आहे. त्यामुळे हा स्मार्टवॉच खरेदी करताना अनेक कलर पर्याय तुम्हाला मिळणार आहे.
नॉईजफिट प्रो 6 आर चे फिचर्स
या स्मार्टवॉचमध्ये 1.46 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याची कमाल ब्राइटनेस 1000 निट्स पर्यंत आहे. 42 मिमी राउंड डायल असलेले हे स्मार्टवॉच धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंगसह येते. कंपनीचा दावा आहे की ते 100 मीटर पर्यंत पाण्यात आरामात काम करू शकते. क्राउन आणि नेव्हिगेशन बटणे स्मार्टवॉचच्या उजव्या बाजूला आहेत.
या स्मार्टवॉचमध्ये बल्ड-ऑक्सिजन पातळी ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्ट्रेस ट्रॅकिंग यासह अनेक हेल्थ ट्रॅकिंग फिचर्स आहेत. याव्यतिरिक्त हे वॉच तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर आधारित स्लीप स्कोअर सुद्धा सांगते आणि हे स्मार्टवॉच महिलांसाठी विशेष फिचर देखील देते.
बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा दावा आहे की हे स्मार्टवॉच सात दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ आणि नियमित वापरासह 30 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते. कंपनीचे म्हणणे आहे की हे वॉच अंदाजे दोन तासांत शून्य ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. या स्मार्टवॉचमध्ये स्ट्रावा इंटिग्रेशनसह बिल्ट-इन जीपीएस देखील आहे.