अॅपल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, आता अॅपल म्युझिकवर 8 भाषांमध्ये ऐका गाणी आणि मिळवा 75 कोटींचा एक्सेस

| Updated on: Aug 01, 2021 | 8:04 PM

अॅपलने 20 जुलै रोजी जगभरातील आणि भारतातील लाखो संगीत प्रेमींसाठी कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय अॅपल म्युझिकवर विशेष ऑडिओ आणि लॉसलेस ऑडिओ लॉन्च केले.

अॅपल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, आता अॅपल म्युझिकवर 8 भाषांमध्ये ऐका गाणी आणि मिळवा 75 कोटींचा एक्सेस
आता अॅपल म्युझिकवर 8 भाषांमध्ये ऐका गाणी आणि मिळवा 75 कोटींचा एक्सेस
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही अॅपल वापरकर्ता असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता तुम्ही अॅपल म्युझिकमध्ये आठ भारतीय भाषांमधील गाणी ऐकू शकता. अॅपलने आज अॅपल म्युझिकमध्ये आठ भाषांमध्ये फ्लॅगशिप प्लेलिस्ट जोडण्याची घोषणा केली. यामध्ये पंजाबी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बंगाली, मराठी आणि हिंदी भाषांचा समावेश आहे. कंपनीच्या मते, सध्या भारतातील संगीतात बॉलिवूड, पॉप, हिप हॉप आणि रॅप, इंडियन पॉप आणि डान्स यांचा समावेश आहे. सिटी चार्टसह, अॅपल म्युझिक जागतिक आणि स्थानिक दोन्ही कलाकारांना एकत्र आणते. (Now listen to songs in 8 languages on Apple Music and get access to 75 crores)

कंपनीच्या मते, “भारतात सध्या आमच्याकडे दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूचे चार्ट आहेत. हे दररोज अपडेट केले जातात, सिटी चार्टला चार्ट पेजवर ब्राउझ सर्च आणि सिरीमध्ये फीचर केले जाते. हे आपल्या लायब्ररीमध्ये जोडले जाऊ शकते, डाउनलोड केले जाऊ शकते आणि मित्रांसह शेअर केले जाऊ शकते.

लोकल टॅलेंट्सला पुढे आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील

कंपनी लोकल टॅलेंट्सना पुढे आणण्यासाठी आणखी पुढाकार घेत आहे, ज्याचे नाव ‘अप नेक्स्ट लोकल आर्टिस्ट प्रोग्राम’ आहे, जे अॅपलच्या विद्यमान ‘अप नेक्स्ट ग्लोबल प्रोग्राम’ च्या बदल्यात दिले जात आहे. हा एक मासिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश स्टार टॅलेंट्स ओळखणे आणि त्यांना बढावा देणे आहे. सध्या भारतात कृष्णा, माळी आणि प्रभ दीप सारख्या कलाकारांचा या यादीत समावेश आहे.

अॅपलने 20 जुलै रोजी जगभरातील आणि भारतातील लाखो संगीत प्रेमींसाठी कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय अॅपल म्युझिकवर विशेष ऑडिओ आणि लॉसलेस ऑडिओ लॉन्च केले. अॅपल म्युझिकने देशातील 75 लाखांहून अधिक गाण्यांची कॅटलॉग आपल्या ग्राहकांना देशातील लॉसलेस ऑडिओमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

75 मिलियन ट्रॅक्स आणि 30,000 पेक्षा जास्त प्लेलिस्ट

कंपनीने जागतिक स्तरावर अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी डॉल्बी एटमॉस आणि लॉस ऑडिओ स्ट्रीमिंगच्या समर्थनासह नेक्स्ट जनरेशनच्या ध्वनीची निर्मिती सुरू केली आहे. अॅपल म्युझिक एडिटोरली क्युरेटेड विशेष ऑडिओ प्लेलिस्टचा एक विशेष संच देखील देत आहे जे श्रोत्यांना त्यांच्या आवडीचे संगीत शोधण्यात मदत करेल आणि पुढील शोध सक्षम करण्यास मदत करेल.

कंपनीच्या मते, एखादी व्यक्ती अॅपल म्युझिकवर दरमहा 99 रुपये (3 महिन्यांची विनामूल्य ट्रायल), विद्यार्थी दरमहा 49 रुपये आणि एक कुटुंब 149 रुपये दरमहा देऊन अॅपल म्युझिकवर 75 मिलियन ट्रॅक्समध्ये प्रवेश मिळवू शकतात. यासह, त्यांना सर्वोत्कृष्ट श्रेणीतील संगीत आणि अॅपल म्युझिक एडिटर्सद्वारे क्युरेटेड केलेल्या 30 हजारांहून अधिक प्लेलिस्ट मिळतील. कंपनीने म्हटले आहे की, याच्या 50 टक्क्यांहून अधिक ग्राहक दर महिन्याला लिरिक्स फंक्शनॅलिटीशी कनेक्ट होतात. (Now listen to songs in 8 languages on Apple Music and get access to 75 crores)

इतर बातम्या

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

VIDEO : नागपुरात राडा ! संघाचं मुख्यालय, काँग्रेसची रॅली, भाजप कार्यकर्ते नडले, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले