WhatsApp : एकाच वेळी चार फोनमध्ये वापरा तुमचे व्हॉट्सअप! आजपासून नवीन फिचरचा श्रीगणेशा

| Updated on: Apr 26, 2023 | 11:35 AM

WhatsApp : व्हॉट्सअप आता एकाचवेळी अनेक डिव्हाईसवर तुम्ही वापरु शकता. युझर्सला एकाचा क्रमांकावरुन 4 स्मार्टफोनमध्ये त्याचे व्हॉट्सअप वापरता येणार आहे. आजपासून या सेवेचा श्रीगणेशा होत आहे.

WhatsApp : एकाच वेळी चार फोनमध्ये वापरा तुमचे व्हॉट्सअप! आजपासून नवीन फिचरचा श्रीगणेशा
आजपासून श्रीगणेशा
Follow us on

नवी दिल्ली : लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने आता काळाची पाऊलं ओळखली आहेत. कंपनीने युझर्सला अनेक नवनवीन फिचर्स देऊन, त्यांना सुविधा दिल्या आहेत. आता व्हॉट्सअपने एकाचवेळी चार डिव्हाईसवर व्हॉट्सअप सुरु करण्याचे फिचर दिले आहेत. एकाच मोबाईल क्रमांकावरुन युझर त्याचे व्हॉट्सअप चार डिव्हाईसमध्ये (Linked to 4 Devices) वापरु शकतो. मेटाने गेल्या महिन्यातच याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार, वापरकर्त्यांना एकाचवेळी 4 डिव्हाईसवर एकच व्हॉट्सअप अकांऊट लिंक करणे सोपे होणार आहे. त्यासाठीचा पर्याय मेटाने (Meta) उपलब्ध करुन दिला आहे. तुमचा मोबाईल अचानक बंद पडला तरी या फिचरमुळे व्हॉट्सअप मॅसेजिंग तुम्ही इतर डिव्हाईसवर वापरु शकता.

चार्जर नसू द्या आता
बऱ्याचदा प्रवासात अथवा एखाद्या ठिकाणी असताना मोबाईल डिस्चार्ज झाल्यावर व्हॉट्सअप आणि इतर सोशल ॲपस बंद पडतात. आपला जगाशी संपर्क बंद होतो. बऱ्याचदा चार्जरही सोबत नसतो, मग अधिक गडबड होते. पण आता या नवीन फिचरमुळे तुम्ही इतर डिव्हाईस, स्मार्टफोनमध्ये तुमचे व्हॉट्सअप लिंक करुन सहज वापरु शकता. त्यामुळे तुमचा नेहमीचा स्मार्टफोन बॅटरी डिस्चार्ज झाल्याने बंद पडला तरी काळजी करण्याचे कारण नाही. चार्जर नसले तरी इतर स्मार्टफोन, डिव्हाईसवर तुमचे व्हॉट्सअप वापरु शकता.

नवीन विंडोज ॲप
चार डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअप लिंक करताना तुमचे चॅट्स Synced आणि एलक्रिप्टेड ठेवता येईल. याशिवाय तुमचा मुख्य स्मार्टफोन बंद पडला तरी जगाशी संपर्क कायम राहिल. मेटाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन डिव्हाईस लिंकिंगची माहिती दिली होती. तसेच ही प्रक्रिया सोप्पी करण्यासाठी पूर्णतः नवीन विंडोज ॲप तयार केले आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन ॲप असे करा डाऊनलोड
मेटाने ट्विटरच्या माध्यमातून नवीन ॲपची माहिती दिली. त्यासाठी एक लिंक शेअर केली होती. व्हॉट्सअपनुसार, डिव्हाईस लिंक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. तसेच सहजच कोणी पण चार ही डिव्हाईसवर एकच ॲप वापरु शकेल. तसेच चॅटिंग करता येईल. नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी युझर्सला https://whatsapp.com/download या लिंकला भेट द्यावी लागेल.

असे लिंक करा व्हॉट्सअप
जर तुम्ही व्हॉट्सअपचे वापरकर्ते असाल. तर चार डिव्हाईसवर एकाच क्रमांकावरुन चॅटिंग करु शकता. त्यासाठी तुम्हाला मल्टि-डिव्हाईस फीचरचा वापर करता येईल. व्हॉट्सअपच्या नवीनत्तम ॲपची आवृत्ती तुम्हाला अद्ययावत करावी लागेल. ॲपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट केल्यावर सर्वात वरती असलेल्या तीन बिंदूवर टॅप करुन तुम्हाला लिंक्ड डिव्हाईस वर टॅप करुन कनेक्ट करता येईल. त्यासाठी QR कोड स्कॅन करावे लागेल.