IPPB Whats App : पोस्टाने टाकली कात! आता व्हाट्सअपवर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, अशी मिळवा सुविधा

IPPB WhatsApp : स्पर्धेच्या युगात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने भरारी घेतली आहे. इतर बँकांना टक्कर देण्यासाठी त्यांनी डिजिटल युगाची कास धरली आहे. ही बँक आता व्हॉट्सअप बँकिंग सेवा देणार आहे. अशी मिळवा सुविधा.

IPPB Whats App : पोस्टाने टाकली कात! आता व्हाट्सअपवर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, अशी मिळवा सुविधा
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 7:05 PM

नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) ग्राहकांच्या सुविधेसाठी अजून एक पाऊल टाकले आहे. खाते अपग्रेड करण्याच्या सुविधेनंतर बँक आता व्हॉट्सअपवर सेवा (WhatsApp Banking Services) देणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने एअरटेलसोबत करार केला आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या स्मार्ट मोबाईलद्वारे बँकिंग सेवांचा लाभ मिळवू शकतील. Airtel IQ द्वारे ही सेवा प्राप्त करता येईल. देशभरातील IPPB ग्राहकांना WhatsApp वर त्यांच्या बँकेशी सहज जोडण्यात येईल. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनला बळकटी देण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

WhatsApp बँकिंगवर मिळेल ही सुविधा

देशातील काही भागातील ग्राहकांना त्यांच्या भाषेत ही मोबाईल सेवा मिळेल. त्यांना आयपीपीबी व्हॉट्सअप सेवा सहजरित्या प्राप्त करता येईल. तसेच त्यांना त्यांची मायबोली निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंग सेवा आणि त्याचा फायदा मिळेल. त्यांना हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त त्यांच्या भाषेत या सेवांची माहिती मिळेल. यामध्ये ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची विनंती करता येईल. तसेच जवळच्या पोस्ट ऑफिसचा पत्ता ही शोधता येईल. इतर ही अनेक सेवा मिळतील.

हे सुद्धा वाचा

लवकरच इतर भाषांमध्ये सेवा

भारतात अनेक भाषा बोललल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग सेवा त्यांच्या भाषेत सहज, सोप्यारित्या कळव्यात यासाठी बहुभाषिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लवकरच देशातील महत्वाच्या भाषांमध्ये मोबाईल व्हॉट्सअप बँकिंग सेवा उपलब्ध होईल. त्यासाठी एअरटेल-आयपीपीबी काम करत आहे.

ग्रामीण भागातील सक्षम दावेदार

पोस्ट ऑफिसच्या सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागात पोहचलेल्या आहेत. आता बँकिंग सेवेच्या माध्यमातून आर्थिक सेवा, बँकिंग सेवांचे मजबूत जाळे केंद्र सरकार तयार करणार आहे. Airtel, IPPB सह देशभरातील ग्राहकांसाठी दरमहा 250 दशलक्ष संदेश पाठविण्यासाठीचा डेटाबेस तयार करत आहे. त्यासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन (Digital India mission) पुढे नेण्यासाठी हे महत्वाचे पाऊल मानण्यात येत आहे.

व्हॉट्सअप सेवेचा लवकरच श्रीगणेशा

पत्र सूचना कार्यालयाने या योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे. अर्थात हे एक महत्वाचे पाऊल आहे. ग्राहकांना ही सेवा लवकरच मिळणार आहे. त्यासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक अद्याप देण्यात आलेला नाही. सर्वोत्तम आर्थिक सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला देण्याचा आयपीपीबी प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. IPPB आणि Airtel IQ व्हॉट्सअप सोल्यूशनमध्ये एक लाईव्ह इंटरअॅक्टिव्ह कस्टमर सपोर्ट एजंट काम करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.