AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टाच्या या स्कीममध्ये 1 एप्रिलपासून मोठा बदल, दरवर्षी 6 लाख रुपये व्याज, होणार डबल फायदा

ज्येष्ठ नागरिकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय असणाऱ्या पोस्टाच्या दोन योजनांमध्ये एक एप्रिलपासून झाला आहे मोठा बदल. त्यामुळे डबल फायदा होणार आहे.

पोस्टाच्या या स्कीममध्ये 1 एप्रिलपासून मोठा बदल, दरवर्षी 6 लाख रुपये व्याज, होणार डबल फायदा
post officeImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 30, 2023 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही लघु बचत योजनांमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या दोन लोकप्रिय योजनामध्ये बदल होणार आहेत. ज्यानंतर या योजना आणखीन आकर्षक होणार आहेत. अर्थसंकल्प 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिकांची सिनियर सिटीजन्स सेव्हींग स्कीम SCSS आणि पोस्ट ऑफीस मंथली इन्कम स्कीम POMIS मध्ये मोठा बदल केला होता. एक एप्रिल पासून SCSS मध्ये गुंतवणूकीची कमाल मर्यादा 15 लाखाहून 30 लाख केली आहे, तर POMIS मध्ये जॉईंट अकाऊंटनूसार गुंतवणूकीची कमाल मर्यादा 9 लाखांहून 18 लाख केली आहे. त्यामुळे योजनांचे मासिक आणि वार्षिक उत्पन्न डबल होणार आहे.

पोस्टाच्या SCSS आणि POMIS या दोन्ही योजनांचा कार्यकाल गुंतवणूकीच्या तारखेनंतर पाच वर्षांचा असतो. SCSS अकाऊंटच्या मॅच्युरीटीवर या योजनेचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढविता येतो. या दोन्ही योजना पोस्टाच्या म्हणजेच सरकारी असल्याने यात कोणतीही क्रेडीट जोखीम नाही. या योजना ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ज्यामुळे रिटायरमेंटनंतर रेग्यूलर मंथली इन्कम मिळते. POMIS वर या वर्षी व्याज वाढून 7.1 टक्के वर्षाला आणि SCSS वर 8 टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे.

SCSS Calculator: 1 एप्रिलपासून गुंतवणूकीवर व्याज

1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीजन सेविंग्‍स स्‍कीम (SCSS) मध्ये डीपॉझिटची कमाल मर्यादा 15 लाखांऐवजी 30 लाख केली आहे. जर तुम्ही पती – पत्नी एकत्र वेगवेगळ्या अकाऊंटने 60 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. केंद्राने 1 जानेवारीपासून व्याजही 8  टक्के केले आहे. या खात्याला आपण पाच वर्षांच्या मॅच्युरीटीनंतरही तीन वर्षे आणखी वाढवू शकतो.

कमाल जमा : 60 लाख रुपये

नवीन व्याज दर : 8 टक्के वार्षिक

मॅच्युरिटी पिरियड : 5 वर्षे

मासिक व्याज : 40,000 रुपये

तिमाही व्याज : 120000 रुपये

वार्षिक व्याज : 4,80,000 रुपये

एकूण व्याजचा फायदा : 24 लाख रुपये

POMIS Calculator: 1 एप्रिलपासून गुंतवणूकीवर व्याज

1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये जमा कमाल रक्कम मर्यादा डबल वाढविली आहे, आता सिंगल खात्यात 9 लाख तर जॉईंट खात्यात 18 लाख जमा करणे शक्य आहे. जानेवारीपासून व्याज 7.1 टक्के केले आहे. या योजनेतील व्याजाला 12 भागात विभागून दर महिन्याला ते अकाऊंटमध्ये जमा होते. या योजनेची मॅच्युरिटी पाच वर्षे आहे, पाच वर्षांनंतर नव्या व्याज दराने या योजनेला वाढविता येते.

व्याज दर : 7.1 टक्के वार्षिक

ज्‍वॉइंट अकाऊंटने कमाल गुंतवणूक : 18 लाख रुपये

वार्षिक व्याज: 127800 रुपये

मासिक व्याज : 10650 रुपये

दोन्ही मिळून वार्षिक आणि मासिक व्याज

दोन्ही योजनाद्वारे मासिक व्याज 40 हजार आणि 10, 650  च्या हिशेबाने 50,650  होणार, तर वार्षिक व्याज 4,80,000 रू. आणि 127800 रूपयांच्या हिशेबाने 6,07,800 रूपये होईल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.