AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus-7 लवकरच भारतात लाँच होणार, किंमत तब्बल….

मुंबई : भारतातील OnePlus मोबाईलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus-7 सिरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहेत. बंगळुरु येथे 14 मे रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात कंपनी हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. OnePlus कंपनी यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या नवीन स्मार्टफोनचे तीन व्हेरिअंट लाँच करणार आहे. यामध्ये OnePlus-7 vanilla edition, OnePlus-7 Pro आणि OnePlus-7 Pro 5-G हे […]

OnePlus-7 लवकरच भारतात लाँच होणार, किंमत तब्बल....
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

मुंबई : भारतातील OnePlus मोबाईलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus-7 सिरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहेत. बंगळुरु येथे 14 मे रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात कंपनी हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. OnePlus कंपनी यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या नवीन स्मार्टफोनचे तीन व्हेरिअंट लाँच करणार आहे. यामध्ये OnePlus-7 vanilla edition, OnePlus-7 Pro आणि OnePlus-7 Pro 5-G हे तीन व्हेरिअंट असतील. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती अनेकवेळा लीक झाली. प्रसिद्ध टिपस्टर इशान अग्रवालने OnePlus-7 स्मार्टफोनच्या व्हेरिअंटबाबत काही खास गोष्टी सांगितल्या होत्या. लीक झालेल्या माहितीनुसार, यावेळी OnePlus-7 Pro स्मार्टफोनचा 12 GB रॅम असलेला व्हेरिअंट लाँच करण्यात येणार आहे.

OnePlus-7 Pro ची किंमत किती?

OnePlus च्या या तिन्ही स्मार्टफोनला 6GB रॅम + 128 GB स्टोरेज, 8GB रॅम + 265 GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 265 GB स्टोरेजमध्ये लाँच केलं जाणार आहे. OnePlus-7 Pro च्या 8GB रॅम + 265 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत जवळपास 58 हजार  640 रुपये असेल, तर 12GB रॅम + 265 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 64 हजार 120 रुपये असू शकते. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 48 हजार 999 रुपये असेल.

OnePlus-7 Pro स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनबाबत लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus-7 Pro मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. तर 13 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा असेल. OnePlus कंपनी पहिल्यांदाच आपल्या कुठल्या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरा सेटअप देत आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा QHD डिस्प्ले, इन डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेंसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असेल, अशीही माहिती आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ