
चीनी स्मार्टफोन ब्रँड OnePlus ने त्यांचा नवीन परवडणारा फोन लाँच केला आहे. यात 8300mAh ची मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट आणि 165Hz AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन अनेक स्टोरेज प्रकारांमध्ये आणि फ्लॅट-पॅनल डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. तर या फोनमध्ये तुम्हाला IP66, IP68, IP69 आणि IP69K सारखे उच्च दर्जाचे धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंग देखील मिळणार आहेत. कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP चा प्राथमिक लेन्स समाविष्ट आहे. तर आजच्या लेखात आपण या स्मार्टफोनची किंमत स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाणून घेऊयात.
कंपनीने चीनमध्ये OnePlus Ace 6T लाँच केला आहे. ज्याची सुरुवातीची किंमत CNY 2,599 भारतीय चलनानुसार अंदाजे 33,000 रुपये आहे. ही किंमत 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. त्याच्या 16GB/256GB व्हेरिएंट असलेल्या फोनची चीनमध्ये किंमत CNY 2,899 भारतीय चलनानुसार 36, 936 इतकी आहे. तर 12GB/512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच भारतीय चलनानुसार 39, 484 आहे. 16GB/512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 3,399 भारतीय चलनानुसार 43,307 इतकी आहे आणि 16GB/1TB व्हेरिएंटची किंमत CNY 3,699 भारतीय चलनानुसार 47,129 आहे. लाँच ऑफरचा भाग म्हणून 200 युआनची सूट देखील दिली जात आहे.
हा फोन फ्लॅश ब्लॅक, फ्लीटिंग ग्रीन आणि इलेक्ट्रिक व्हायलेट रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन भारतात OnePlus 15R म्हणून लाँच होऊ शकतो.
OnePlus Ace 6T मध्ये 165Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 nits ब्राइटनेससह 6.83-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट आहे, जो 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह येतो.
या फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/1.8 अपर्चर आहे. याच्यासोबत 112-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. रिअर कॅमेरा 120 फ्रेम प्रति सेकंद पर्यंत 4K व्हिडिओ शूट करू शकतो, तर फ्रंट कॅमेरा 30 फ्रेम प्रति सेकंद पर्यंत 1080 पी व्हिडिओ सपोर्ट करतो.
OnePlus Ace 6T ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 8,300mAh बॅटरी, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येते. सुरक्षिततेसाठी, यात इन-डिस्प्ले 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi 7, NFC, USB Type-C, GPS, Beidou, GLONASS आणि Galileo यांचा समावेश आहे. हा फोन IP66, IP68, IP69 आणि IP69K प्रमाणित आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनतो.