OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन अवघ्या तासात होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus Nord 3 5G : वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन अवघ्या काही तासात लाँच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनबाबत उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात फीचर्स आणि इतर बाबी

OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन अवघ्या तासात होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे का? मग जाणून घ्या किंमत आणि इतर बाबी
| Updated on: Jul 04, 2023 | 7:47 PM

मुंबई : वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन 5 जुलै 2023 रोजी लाँच केला जाणार आहे. फोनचं लॉचिंग संध्याकाळी 7 वाजता हा स्मार्टफोन यूट्युब, वनप्लस वेबसाईटवर केलं जाईल. या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्लेसह 120 एचझेड सुपर फ्लूईड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. वनप्लस फोटोग्राफीच्या दृष्टीकोनातून जबरदस्त फोन असणार आहे. यात फ्लॅगशिप सोनी आयएमएक्स 890 तसेच ओआयएस सपोर्ट दिला जाणार आहे.वनप्लस नॉर्ड 3 च्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगा पिक्सल सेंसर आणि 2 मेगापिक्सल सेंसर सपोर्ट असेल. फ्रंटलाा 16 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप असेल. हा स्मार्टफोन अलर्ट स्लाइडरसह येईल. गेल्या काही दिवसांपासून नॉर्ड डिव्हाईसमधून गायब झालं होतं.

या स्मार्टफोनमध्ये काय असू शकते

वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असेल. त्यात 120 एचझेड रिफ्रेश रेट पाहायला मिळू शकतो. वनप्लस नॉर्ड 3 रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल. यात टेम्पेस्ट ग्रे आणि मिस्टी ग्रीन रंगाचा समावेश असेल. फोनमध्ये मीडियाटेक डामेंसिटी 9000 एसओसी चिपसेट सपोर्टसह असेल. हा फोन 16 जीबी रॅम सपोर्टसह येईल. फोनमध्ये 256 जीबीपर्यंत स्टोरेज सपोर्ट दिलं जाईल. वनप्लस नॉर्ड 3 ला 80 व्हॅट सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 बेस्ड ऑक्सिजन ओएस 13.1 ला सपोर्ट करेल.

फोटो आणि व्हिडीओ प्रोसेसिंग फास्ट करण्यासाठी कंपनीने यात 16 जीबीची एलपीडीडीआर5एक्स रॅम दिलं आहे. रॅम मोठा असल्याने ग्राफिक्सवाले गेम खेळताना अडचण येणार नाही. हेव्ही टास्क आरामात करू शकता. वनप्लस नॉर्ड 3 मध्ये ग्राहकांना व्हर्च्युअल रॅम सपोर्टही असेल.

या स्मार्टफोनमध्ये आयआर ब्लास्टर दिलं जाणार आहे. या फीचर्सच्या मदतीने युजर्स रिमोटसारखा याचा वापर करू शकतात. यात एनएफसी कनेक्टिव्हिटी असण्याची शक्यता आहे.वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 32,999 रुपये असण्याची शक्यता आहे.