AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus हा फोन लवकरच 8000mAh बॅटरीसह लाँच होऊ शकतो. हा फोन परफॉर्मन्स-बेस्ड मॉडेल असेल. भारतात हा फोन कधी लाँच होईल आणि तो कोणत्या प्रोसेसरवर चालेल ते जाणून घेऊयात?

OnePlus चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
oneplus-turbo
| Edited By: | Updated on: Oct 27, 2025 | 10:58 PM
Share

आपण आतापर्यंत 7000mAh बॅटरी असलेले बरेच फोन पाहिले असतील, आणि वापरले सुद्धा असणार. पण OnePlus या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा एक नवीन फोन जो 8000mAh बॅटरीने सुसज्ज करण्यात आलेला आहे तो लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. 8000mAh बॅटरीसह येणाऱ्या हा पावरफुल फोन OnePlus Turbo असे या डिव्हाइसचा नाव आहे. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 5 चिपसेटने चालवला जाऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण वनप्लसच्या या फोनचे फिचर्स आणि किंमत तसेच हा फोन भारतात कधी लाँच होऊ शकतो ते जाणून घेऊयात.

लीकनुसार वनप्लस टर्बोचे स्पेसिफिकेशन्स

  • Macan या इंटरनल कोडनेम असलेल्या वनप्लस स्मार्टफोनला वनप्लस टर्बो म्हणून लाँच केले जाण्याची अपेक्षा आहे. हे पूर्णपणे परफॉर्मन्स-ओरिएंटेड मॉडेल असेल ज्यामध्ये उच्च रिफ्रेश रेट स्क्रीन आणि पॉवरफुल चिपसेट असू शकेल.
  • डिस्प्ले: OnePlus Turbo मध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा OLED स्क्रीन दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरल 5 चिपसेटसह ग्लेशियर कूलिंग सिस्टम दिले जाऊ शकते जे फोन थंड करण्यास मदत करेल.
  • कॅमेरा सेटअप: वनप्लस टर्बोमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील असण्याची अपेक्षा आहे.
  • खास फिचर्स: या हँडसेटमध्ये चांगल्या आवाजाच्या गुणवत्तेसाठी स्टीरिओ स्पीकर्स, सुरक्षिततेसाठी NFC आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो.
  • बॅटरी: या हँडसेटमध्ये 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000 एमएएच बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.

भारतात वनप्लस टर्बो लाँचची तारीख (लीक)

स्मार्टप्रिक्सच्या एका अहवालानुसार वनप्लस टर्बोची सध्या भारतात चाचणी सुरू आहे. हा फोन पुढील दोन महिन्यांत लाँच होण्याची अपेक्षा आहे. सध्या त्याची नेमकी लाँच तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्याची किंमत किती आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...