आपण आतापर्यंत 7000mAh बॅटरी असलेले बरेच फोन पाहिले असतील, आणि वापरले सुद्धा असणार. पण OnePlus या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा एक नवीन फोन जो 8000mAh बॅटरीने सुसज्ज करण्यात आलेला आहे तो लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. 8000mAh बॅटरीसह येणाऱ्या हा पावरफुल फोन OnePlus Turbo असे या डिव्हाइसचा नाव आहे. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 5 चिपसेटने चालवला जाऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण वनप्लसच्या या फोनचे फिचर्स आणि किंमत तसेच हा फोन भारतात कधी लाँच होऊ शकतो ते जाणून घेऊयात.
लीकनुसार वनप्लस टर्बोचे स्पेसिफिकेशन्स
- Macan या इंटरनल कोडनेम असलेल्या वनप्लस स्मार्टफोनला वनप्लस टर्बो म्हणून लाँच केले जाण्याची अपेक्षा आहे. हे पूर्णपणे परफॉर्मन्स-ओरिएंटेड मॉडेल असेल ज्यामध्ये उच्च रिफ्रेश रेट स्क्रीन आणि पॉवरफुल चिपसेट असू शकेल.
- डिस्प्ले: OnePlus Turbo मध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा OLED स्क्रीन दिला जाऊ शकतो.
- प्रोसेसर: या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरल 5 चिपसेटसह ग्लेशियर कूलिंग सिस्टम दिले जाऊ शकते जे फोन थंड करण्यास मदत करेल.
- कॅमेरा सेटअप: वनप्लस टर्बोमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील असण्याची अपेक्षा आहे.
- खास फिचर्स: या हँडसेटमध्ये चांगल्या आवाजाच्या गुणवत्तेसाठी स्टीरिओ स्पीकर्स, सुरक्षिततेसाठी NFC आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो.
- बॅटरी: या हँडसेटमध्ये 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000 एमएएच बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.
भारतात वनप्लस टर्बो लाँचची तारीख (लीक)
स्मार्टप्रिक्सच्या एका अहवालानुसार वनप्लस टर्बोची सध्या भारतात चाचणी सुरू आहे. हा फोन पुढील दोन महिन्यांत लाँच होण्याची अपेक्षा आहे. सध्या त्याची नेमकी लाँच तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्याची किंमत किती आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.