AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Online Fraud : भारतात दररोज 100 पैकी 12% लोक ठरतात ऑनलाईन फसवणूकीचे बळी, सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगते?

GSMA च्या India Consumer Scam Report 2026 नुसार, भारतात ऑनलाइन फसवणुकीचा अनुभव सांगणाऱ्यांचे प्रमाण 12 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.ऑनलाइन शॉपिंग, नोकरीचे आमिष आणि पेमेंट लिंकशी संबंधित फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत.

Online Fraud : भारतात दररोज 100 पैकी 12% लोक ठरतात ऑनलाईन फसवणूकीचे बळी, सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगते?
online fraudImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 6:53 PM
Share

ऑनलाईन शॉपिंग करताना एखादी आकर्षक ऑफर दिसली, घरबसल्या पैसे कमावण्याची नोकरी मिळाली किंवा मोबाईलवर पेमेंटची लिंक आली, तर आपण लगेच विश्वास ठेवतो. पण हाच विश्वास सध्या चांगलाच महागात पडताना दिसतोय. काहींच्या बाबतीत चांगल होत असेलही पण GSMA च्या सर्वेनुसार सध्या भारतात 100 पैकी 12% टक्के लोक सायबर फसवणूकीच्या सापळ्यात अडकतात.

GSMA ही मोबाईल क्षेत्राशी संबंधित जागतिक संस्था आहे. तिच्या India Consumer Scam Report 2026 रिपोर्ट नुसार भारतात Online फसवणूकीचा अनुभव सांगणाऱ्यांच प्रमाण 12% आहे. इंडोनेशिय, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स या सहा देशांमध्ये हे प्रमाण 8 टक्के नोंदवण्यात आले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फसवणूकीचा अनुभव असलेल्या लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगशी संबंधित प्रकार सर्वाधिक होते. त्यांच्यापैकी 33 टक्के लोकांनी अशा फसवणूकीचा अनुभव सांगितला. त्यानंतर बक्षीस, लॉटरी आणि वारशाच्या नावाखाली होणार्‍या फसवणूकीचं प्रमाण 31 टक्के होत. नोकरीच्या आमिषाने फसवलेल्या लोकांचे प्रमाण 30 टक्के आहे, तर QR CODE आणि पेमेंट लिंकशी संबंधित फसवणूकीचं प्रमाण 27 टक्के आहे.

मेसेजिंग अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर

सायबर फ्रॉड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतात. 42% लोक मेसेजिंग अॅप्सचा, 37% टक्के प्रकरणांमध्ये सोशल मीडियाचा आणि 33% टक्के प्रकरणांमध्ये ईमेलचा वापर करतात. आता AI चा वापरही फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये वाढला आहे. ज्यात AI च्या मदतीने तयार केलेले मेसेजेस, बनावट फोटो, खोटी ऑनलाईन प्रोफाईल आणि डिफेक व्हिडिओ यांचा समावेश आहे.

त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करणं. संशयास्पद QR CODE स्कॅन करणं किंवा अनोळखी व्यक्तीला OTP सांगणं टाळणं गरजेचं आहे.नोकरी किंवा बक्षिसांच आमिष दाखवून पैसे मागितले जात असतील तर त्याची आधी खात्री करावी. डिजीटल व्यवहार करताना थोडी काळजी बाळगली तर फसवणूकीचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...