ओप्पोची दमदार एंट्री ! पॉवरफुल प्रोसेसर असलेल्या एक्स 5 फोनची नवी सीरीज, असे आहे फिचर्स…

| Updated on: Feb 18, 2022 | 12:41 PM

ओप्पो 24 फेब्रुवारीला ओप्पो फाइंड एक्स 5 सिरीजमधील स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा स्मार्टफोन ओप्पो फाइंड एक्स 5 आणि ओप्पो फाइंड एक्स 5 Pro असेल. यामध्ये 16 GB पर्यंत रॅम मिळू शकते, त्यामुळे ग्राहकांना आपला डाटा स्टोअर करण्याची क्षमता वाढवून मिळू शकते.

ओप्पोची दमदार एंट्री ! पॉवरफुल प्रोसेसर असलेल्या एक्स 5 फोनची नवी सीरीज, असे आहे फिचर्स...
Oppo-Find-X5
Follow us on

मुंबईओप्पो (Oppo) आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सिरीजचे नाव ओप्पो फाइंड एक्स 5 (Oppo Find X5) राहणार आहे. याअंतर्गत दोन स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. यात प्रो आणि स्टँडर्ड व्हेरियंट असेल. ही सिरीज 24 फेब्रुवारीला लाँच करण्याचे नियेाजन आहे. यापूर्वी होण्यापूर्वी एका वेबसाइटने त्याचे फिचर्सची माहिती ग्राहकांसाठी दिली आहे. ओप्पोच्या या आगामी मोबाईल स्मार्टफोन मध्ये (Smartphone) 16 जीबीपर्यंत रॅम आणि स्नैपड्रैगन 8 जेन 1 चिपसेट मिळेल. कॅमेऱ्याची क्षमता वाढवण्यासाठी पहिल्यांदाच ओप्पोने स्वतःचे एनपीयू, मारीसिलिकन एक्स वापरले आहे.

ओप्पोने माहिती दिलीयं, की ओप्पो फाइंड एक्स 5 प्रोमध्ये क्वलकॉमच्या स्नैपड्रैगन 8 Gen 1 चा वापर करणार आहे. तसेच, कंपनीने अलीकडेच प्रामुख्याने व्यावसायिक कॅमेरे तयार करत असलेल्या हेजेलब्लाड या स्वीडिश कंपनीशी भागीदारी केली आहे, कंपनी वन प्लस (OnePlus) या कंपनीच्या सहकार्याने फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी कॅमेरे देखील तयार करते. मात्र, ओप्पोने कॅमेरा सेटअपबद्दल अजून काहीही माहिती दिलेली नाही. ओप्पो फाइंड एक्स 5 आणि ओप्पो फाइंड एक्स 5 प्रो चीनच्या ‘टीना’ वेबसाइटवर लिस्टेड आहे, ज्यामध्ये मोबाईलबद्दल माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हा फोन चीनमध्ये उपलब्ध होणार असून भारतात तो कधी लाँच होईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, मोबाईलचे मॉडेल क्रमांक PFEM10 आणि PFFM10 आहेत, जे ओप्पो फाइंड एक्स मालिकेतील आहेत.

काय आहे स्पेसिफिकेशन

ओप्पो फाइंड एक्स 5 प्रोमध्ये 6.7 इंचाचा क्वाड एचडी प्लस एमोलेड डिसप्ले मिळेल. तर एक्स 5 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये स्नैपड्रैगन 8 जेन 1 प्रोसेसरदेखील मिळेल, तर एक्स 5 मध्ये स्नैपड्रैगन 888 चिपसेट वापरला जाईल. दुसरीकडे, ओप्पो फाइंड एक्स प्रोला 16 GB RAM आणि 512 GB स्टोरेज मिळेल, 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. ओप्पो फाइंड एक्स 5 आणि प्रोच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, प्रो प्रकारात दोन 50 मेगापिक्सलचे कॅमेरे मिळतील, तर तिसरा कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा असेल, जो टेलीफोटो लेन्ससह नॉक करेल. दोघांचा सेल्फी कॅमेरा बदलला जाऊ शकतो. दोन्ही स्मार्टफोन्सना 80W वायर चार्जिंग मिळेल, तर बॅटरी स्वतंत्रपणे वापरल्या जातील. प्रो व्हेरिएंटमध्ये 5000 mAh बॅटरी असेल, तर स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 4800 mAh बॅटरी असेल.

इतर बातम्या

फेसबुकचा नवा निर्णय ‘न्यूज फीड’ आता केवळ ‘फीड’… काय आहे कारण?

Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या