AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुधीर जोशी यांचं अंतिम दर्शन घेताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं काल निधन झालं आहे, त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुधीर जोशी यांचं निधन मुंबईत झालं असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुधीर जोशी यांचं अंतिम दर्शन घेताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले
पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत असताना रश्मी ठाकरेंचे डाेळे पाणावले
| Updated on: Feb 18, 2022 | 12:29 PM
Share

मुंबई – सुधीर जोशी (sudhir joshi) यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि रश्मी ठाकरे (rashmi  thackeray) उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील स्माशनभूमी परिसरात उपस्थित आहेत. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर अनेकांनी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. आज त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे. पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत असताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले होते. त्यावेळी त्यांनी सुधीर जोशी यांच्या घरच्यांना आधार देखील दिला. तसेच त्यावेळी त्याच्यासोबत तिथं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे देखील उपस्थित आहेत. अंतिम दर्शन घ्यायला शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत.

बाळासाहेबांचे सुरवातीपासूनचे सहकारी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं काल निधन झालं आहे, त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुधीर जोशी यांचं निधन मुंबईत झालं असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधीर जोशी यांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. शिवसेना सुरूवातीला वाढत असताना त्यांनी शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे काम केले होते. त्याच्याकडे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. त्यांच्या निधनामुळं अनेक शिवसैनिक नाराज झाले आहेत.

कोरोना झाल्याने रूग्णालयात घेतले उपचार

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुधीर जोशी यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातुन त्यांना बरे वाटायला लागल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली. पंरतु त्यांची अचानक त्यांची तब्येत ढासल्याने त्यांचं निधन झालं. 1972 मध्ये ते मुंबईचे महापौर राहिले आहेत. सुधीर जोशी यांना शिवसेनेचं दुसरं महापौर मिळालं होतं. त्याचबरोबर ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार देखील राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची कारर्कीद राजकीयदृष्ट्या अतिशय चांगली राहिली आहे.

Nagpur | माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य, जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, काय आहे ही स्पर्धा?

Aurangabad Mystery| गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!

Latur Crime : 500 रुपयांसाठी तरुणाची हत्या, आगोदर चित्रिकरण पुन्हा मारहाणीत आई समोरच मृत्यू,8 जणांना जन्मठेप

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.