AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Crime : 500 रुपयांसाठी तरुणाची हत्या, आगोदर चित्रिकरण पुन्हा मारहाणीत आई समोरच मृत्यू,8 जणांना जन्मठेप

केवळ 500 रुपयांसाठी एका तरुणास अत्यंत निर्दयीपणे हाल करुन ठार केल्याची चार वर्षापूर्वी लातूर शहरात घडली होती.घटनेच्या 4 वर्षानंतर याबाबत लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणातील सर्वच्या सर्व आठ आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शादुल शेख रा. अंजलीनगर या तरुणाचा शहरातीलच टाऊन हॉल मैदानावर आईस गोळ्याचा गाडा होता.

Latur Crime : 500 रुपयांसाठी तरुणाची हत्या, आगोदर चित्रिकरण पुन्हा मारहाणीत आई समोरच मृत्यू,8 जणांना जन्मठेप
लातूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान सर्व आरोपींना आणण्यात आले होते.
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 12:10 PM
Share

लातूर : केवळ 500 रुपयांसाठी एका तरुणास अत्यंत निर्दयीपणे हाल करुन ठार केल्याची चार वर्षापूर्वी लातूर शहरात घडली होती.घटनेच्या 4 वर्षानंतर याबाबत (Latur District and Sessions Court) लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणातील सर्वच्या सर्व आठ आरोपींना  (Life sentence) जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. (Latur Crime) शादुल शेख रा. अंजलीनगर या तरुणाचा शहरातीलच टाऊन हॉल मैदानावर आईस गोळ्याचा गाडा होता. एप्रिल 2018 मध्ये गाडा लावला असताना आरोपींनी त्याला 500 रुपायांची मागणी केली होती पण शादुल ही रक्कम देण्यास विरोध दर्शवला होता. याचाच राग मनात धरुन आरोपींनी त्यास मारहाण केली होती. यामध्ये त्याचे हाल करुन अत्यंत निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तब्बल आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाचे हे आदेश येताच आरोपींच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता.

आठ जणांनी केली अमानुष मारहाण

शादुल शेख आणि या घटनेतील आरोपी यांची घटना घडण्यापूर्वीही वाद झाले होते. मात्र, त्याने 500 रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपी अन्वर सय्यद याने त्याला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरी बोलावून घेतले होते. दरम्यान, सय्यदच्या घरातील एका पत्रा खोलीमध्ये शादुल यास उलटे डांबून मारहाण करण्यात आली होती. एवढेच नाही तर यातील सर्व आरोपींनी त्याच्या नाका-तोंडात चटणीची पूड टाकली होती. दारुच्या नशेत असलेल्या आरोपी हाजीअली दस्तगीर शेख याने तर शादुलच्या आईला फोन करुन तुझ्या मुलाला मारहाण करीत आहोत. हा सीन पाहयाला आणि मुलाला वाचवायला ये म्हणून फोनही केला होता. त्यामुळे मयत शादुलची आई घटनास्थळी दाखलही झाली होती. मात्र, या आठ आरोपींसमोर तिचा नाईलाज झाला.

महिला आरोपीने केला होता व्हिडीओ

या प्रकरणात महिला आरोपी असणाऱ्या अन्वर सय्यद याची पत्नी शन्नू हीने स्वत:च्या मोबाईलवर या सर्व मारहाणीचा व्हिडीओ केला होता. एवढ्या अमानुषपणे मारहाण होत असताना आठपैकी एकालाही शादुलवर दया आली नाही. सकाळी 11 वाजता सुरु झालेली मारहाण ही दुपारी 3 पर्यंत सुरु असल्याचे वकीलांनी सांगितले आहे. शिवाय घटनेच्या दिवशी दुपारी 4 वाजता शादुल याचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता मृत घोषित केले होते.

न्यायालयाने निकाल देताच नातेवाईकांचा आक्रोश

सदरील घटनेच्या निकाला दरम्यान, गुरुवारी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवत कलम 302 नुसार जन्मठेपीची शिक्षा सुनावली. यामध्ये हाजीअली दस्तगीर शेख, युसुफ फारुख शेख, जब्बार सत्तार सय्यद, शन्नू अन्वर सय्यद, अन्वर दस्तगीर सय्यद, दौलत बाबुमिया शेख, सलीम नजीर सय्यद व बाळू पंडीत सुर्यवंशी सर्व राहणार लातूर यांचा समावेश आहे. गुरुवारी या प्रकरणी सर्वच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा होताच कोर्टात असणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. अखेर घटनेच्या 4 वर्षानंतर या प्रकरणी निकाल लागला असून सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष देशपांडे यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या :

बिबट्याने घेतला 16 वर्षीय मुलाचा घास, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुरात रात्री नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, पोंभुर्ण्याने भाजपची लाज राखली

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांवर महावितरणची कारवाई, राज्यातल्या 6 एजन्सी बडतर्फ, नांदेड-औरंगाबादचा समावेश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.