AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, पोंभुर्ण्याने भाजपची लाज राखली

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी पाच ठिकाणी यश मिळविले. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला झेंडा रोवता आला. सत्तेसाठी महाविकास आघाडी एकत्र आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, पोंभुर्ण्याने भाजपची लाज राखली
चंद्रपूर जिल्ह्यात नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली.
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 2:54 PM
Share

चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी 5 ठिकाणी यश मिळविले आहे. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला (BJP flag) झेंडा रोवता आलाय. आज या 6 जागी नवे कारभारी निवडण्यासाठी मतदान पार पडले. जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढली नसली तरी अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मात्र तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी नगरपंचायत निवडणूक की बाहेर एकच जल्लोष केला. गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेस – शिवसेनेचा झेंडा रोवला गेलाय. यात नगराध्यक्ष पदावर काँग्रेसच्या (Congress) सविता कुळमेथे तर उपनगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या ( Shiv Sena) सारिका मडावी विजयी झाल्या आहेत.

पोंभुर्णा नगरपंचायतवर भाजपचा झेंडा

पोंभुर्णा नगरपंचायतीवर भाजपने आपला झेंडा रोवला. नगराध्यक्षपदी सुलभा पिपरे तर उपनगराध्यक्षपदी अजित मंगळगिरीवार यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींपैकी फक्त एका ठिकाणी भाजपनं आपली लाज राखली आहे. निवडणूक स्वतंत्रपणे लढली, तरी अन्यत्र महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली. त्यामुळं भाजपचे पानीपत झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी पाच ठिकाणी यश मिळविले. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला झेंडा रोवता आला. सत्तेसाठी महाविकास आघाडी एकत्र आली.

सावली नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

सिंदेवाही- लोणवाही नगरपंचायतीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. नगराध्यक्षपदी स्वप्नील कावळे तर उपाध्यक्ष मयूर सूचक यांची निवड झाली आहे. कोरपना नगरपंचायत काँग्रेसने जिंकली आहे. नगराध्यक्ष नंदाताई बावणे, उपाध्यक्षपदी शेख इसाईल रसूल विजयी झाले आहेत. जिवती नगरपंचायतीवर काँग्रेस- राष्ट्रवादी यांची सत्ता स्थापन झाली आहे. नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या कविता आडे तर उपाध्यक्ष पदी डॉ. अंकूश गोतावळे विजयी झाले आहेत. सावली नगरपंचायतीवर काँग्रेसने झेंडा रोवला. अध्यक्षपदी लता लाकडे तर उपाध्यक्ष म्हणून संदीप पुण्यापकार यांची निवड झाली आहे.

Nagpur RTI | तीन वर्षांत दहा हजार नागपूरकरांना ‘चावा’, 933 जणांना चावली मांजर; भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा दावा फोल?

Nagpur Crime | नागपूर जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला; कोरोनामुळं बालविवाह वाढताहेत?

Bhandara Shiv Sena | पवनीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये मुंबईत प्रवेश, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर दाखविला विश्वास

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.