Nagpur RTI | तीन वर्षांत दहा हजार नागपूरकरांना ‘चावा’, 933 जणांना चावली मांजर; भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा दावा फोल?

तीन वर्षांत दहा हजार नागपूरकरांना वेगवेगळ्या जनावरांनी चावा घेतलाय. भटके कुत्रे, मांजर, मुंगूस, घोडा, माकडं आणि उंदीरंही चावले. नागपूर महापालिकेने RTI मध्ये ही धक्कादायक माहिती दिलीय.

Nagpur RTI | तीन वर्षांत दहा हजार नागपूरकरांना ‘चावा’, 933 जणांना चावली मांजर; भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा दावा फोल?
नागपूर महानगरपालिकेअतंर्गत वयोश्री योजनेची सुरुवात करण्यात आली.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 11:07 AM

नागपूर : माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर (Abhay Kolarkar) यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Municipal Health Department) माहिती अधिकारात काही माहिती मागितली. यामध्ये गेल्या तीन वर्षांत नागपुरातील कुत्रे व इतर प्राण्यांनी किती जणांचा चावा घेतला. महापालिकेने प्राण्यांच्या नावांसह कोणत्या प्राण्याने कोणत्या वर्षी किती जणांचा चावा घेतला याची माहिती दिली. त्यानुसार सर्वाधिक चावा हा कुत्र्यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले. गेल्या तीन वर्षांत आठ हजार 843 जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळं भटक्या कुत्र्यांवरील नसबंधीचा दावा फोल ठरला. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर (Sterilization ) दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे.

कुत्र्यांच्या नसबंदीचा दावा फोल

नागपूर शहरात भटके कुत्रे, मांजर, मुंगूस, घोडा, माकडंही चावले आहेत. नागपूर मनपाची RTI मध्ये ही धक्कादायक माहिती दिली. तीन वर्षांत आठ हजार 843 नागपूरकरांना भटके कुत्रे चावलेत. तीन वर्षांत 933 जणांना मांजर चावली. विशेष म्हणजे भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक चावा नागपूरकरांना मिळाला. यामुळं मनपाचा भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा दावा फोल ठरलाय. शहराच्या कोणत्याही रस्त्याने जा. कुत्रे नसतील, असं होत नाही. कुत्र्यांचे टोळकेच्या टोळके रस्त्यांवर फिरत असतात. लहान मुलं रस्त्यावर कुत्रे असतात म्हणूच पायी चालण्यास घाबरतात. शाळेत जायचं असेल, तरी कुत्रे असतात म्हणून ते भीतात. त्यामुळं या कुत्र्यांचा बंदोबस्त लावणे आवश्यक आहे. मनपा प्रशासन कारवाई करते. पण, ही कारवाई थातूरमातूर असल्यानं कुत्र्यांचा वावर अजूनच वाढतो. यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वाधिक कमी चावा घोड्यांचा

गेल्या तीन वर्षांत फक्त पाच घोड्यांनी चावा घेतला. माकडांनी 148 जणांचा चावा घेतला. उंदीर 190 जणांना चावले. ससे 19 जणांना, तर डुक्कर 25 जणांना गेल्या तीन वर्षांत चावले. मुंगुसाने 68 जणांचा, तर इतर प्राण्यांनी गेल्या तीन वर्षांत 31 जणांचा चावा घेतल्याची माहिती अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात महापालिकेनं दिली. तीन वर्षांत दहा हजार नागपूरकरांना वेगवेगळ्या जनावरांनी चावा घेतलाय. भटके कुत्रे, मांजर, मुंगूस, घोडा, माकडं आणि उंदीरंही चावले. नागपूर महापालिकेने RTI मध्ये ही धक्कादायक माहिती दिलीय.

Nagpur | आता महिला उद्योजकांसाठी स्टार्ट अप, आर्थिक सक्षमीकरणाचा उपक्रम काय आहे, जाणून घ्या

Bhandara | कोरोनात जिच्या पतीचा झाला मृत्यू तिनेच सावरला व्यवसायाचा गाडा, भंडाऱ्यातील महिलेची संघर्षमय कहाणी

नागपुरात महसूल विभागाचे महाराजस्व अभियान; फेरफार अदालत शुक्रवारी, नेमकी कोणती कामे होणार?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.