फेसबुकचा नवा निर्णय ‘न्यूज फीड’ आता केवळ ‘फीड’… काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आपल्या यूजर्ससाठी आपल्या सुरक्षेविषयक धोरणांमध्ये तसेच आपल्या एकंदर स्ट्रक्चरमध्ये वारंवार बदल करत आहे. नुकतेच फेसबुकने जाहीर केलेल्या एका निवेदनात ‘न्यूज फीड’ आता केवळ ‘फीड’ म्हणून ओळखले जाणार असल्याचे सांगितले आहे.

फेसबुकचा नवा निर्णय ‘न्यूज फीड’ आता केवळ ‘फीड’... काय आहे कारण?
फाईल फोटोImage Credit source: google
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 9:22 AM

स्पर्धेत टीकून राहण्यासाठी तसेच आपल्या कोट्यावधी फोलोव्हर्सना फेसबुकशी (Facebook) एकसंघपणे बांधून ठेवण्यासाठी फेसबुककडून अनेक बदल करण्यात येत आहे. मागेही युजर्सच्या खासगी माहिती संदर्भात फेसबूकने आपल्या सुरक्षेसंबंधीत धोरणांमध्ये मोठा बदल केल्याचे आपण पाहिले आहे. मेटाने फेसबुक न्यूज फीडचे नाव बदलले आहे. न्यूज फीडला आता फक्त ‘फीड’ म्हटले जाईल. ब्रँड प्लॅटफॉर्मवर काही महत्त्वाचे बदल करत असल्याचे मेटाने (Meta) सांगितले आहे. ‘न्यूज फीड’मध्ये (News feed) ‘न्यूज’चा उल्लेख केल्याने युजर्सची दिशाभूल होऊ शकते. ‘न्यूज’ लेबलमुळे काहींना असे वाटू शकते की यात, केवळ बातम्या आहेत. त्यामुळे फेसबुकने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘आजपासून, आमचे न्यूज फीड आता ‘फीड’ म्हणून ओळखले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. ‘न्यूज फीड’ हे नाव गेल्या 15 वर्षांपूर्वी पहिल्यांदा फेसबुककडून देण्यात आल होते.

फेसबुकव्दारे एका निवेदाव्दारे सांगण्यात आले आहे की, युजर्स त्यांच्या फीडवर पाहतात त्या सर्व प्रकारचे कंटेंट अजून चांगल्या पध्दतीने दाखवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फीड या नवीन नावामुळे अॅपमधील फीचरर्सवर कुठलाही बदल होणार नसल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले आहे. दरम्यान, मेटाकडून आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये असे काही बदल केले जाणार आहेत, की त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘अल्गोरिदम’ चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्ट शोधण्याचे आणि काढून टाकण्याचे काम करु शकणार आहेत. न्यूजफीडचे नाव फीड असे बदलून फेसबुक आपले प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करीत आहे. कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला घोषणा केली की, ती फ्रान्समधील त्यांच्या वापरकर्त्यांसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन ‘न्यूज’ टॅब आणत आहे. हा नवीन न्यूज टॅब विश्वसनीय बातम्या स्रोतांच्या श्रेणीतील बातम्या दाखवण्यास मदत करणार आहे. त्यामुळे, ‘न्यूजफीड’ मधून ‘बातम्या’ काढून टाकणे फेसबुकसाठी बातम्या आणि सामान्य नॉन-न्यूज फीडमध्ये फरक करण्याचा एक पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

फेसबुकला बसला मोठा फटका

गेल्या काही काळापासून फेसबुकला मोठा फटका बसत आहे. फेसबुकने जागतिक स्तरावर दैनंदिन युजर्स गमावले आहे. तसेच अपेक्षेपेक्षा जाहीरातींमध्येही वाढ होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांमुळेच त्यांचे शेअरर्स साधारणत 20 टक्के घसरले आहेत. मोठ्या प्रमाणात शेअर्स घसरल्याने त्याचे बाजार मूल्य सुमारे 200 बिलियन डॉलरने कमी झाले आहे. मेटा-मालकीच्या फेसबुक प्लॅटफॉर्मने 2021 च्या चौथ्या तिमाहीत 1.929 अब्ज रोजच्या युजर्सची नोंद केली आहे.

Realme 9 pro आणि 9 pro Plus भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

WhatsApp ओपन न करता पूर्ण मेसेज वाचा, मेसेज रीड केल्याचं समोरच्याला कळणारच नाही

एलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला टक्कर, Jio कडून सॅटेलाइटवर आधारित इंटरनेटची चाचपणी

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.