एलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला टक्कर, Jio कडून सॅटेलाइटवर आधारित इंटरनेटची चाचपणी

रिलायन्स जिओ ब्रॉडबँड इंटरनेटच्या संदर्भात एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारी आहे. कंपनीने सॅटेलाइट आधारित इंटरनेट देण्यासाठी एसईएससोबत करार केला आहे. एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’शी मुकाबला करण्यासाठी जिओ ‘ॲक्शन मोड’वर आहे असे दिसून येत आहे.

एलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला टक्कर, Jio कडून सॅटेलाइटवर आधारित इंटरनेटची चाचपणी
Mukesh Ambani
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Feb 15, 2022 | 1:36 PM

मुंबई : रिलायन्सने जिओच्या (Reliance Jio) माध्यमातून भारतात इंटरनेट क्षेत्रात क्रांती केली आहे. अजून पुढील टप्प्यात सॅटेलाइटवर आधारित इंटरनेटची सेवा देण्यासाठी जिओकडून मोठे पाउल टाकले जात आहेत. रिलायन्स जिओ लवकरच सॅटेलाइटवर आधारित ब्रॉडबँड कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. याच्या मदतीने, इंटरनेट वापरत असताना वापरकर्त्याला 100Gbps एवढ्या वेगाने इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी सॅटेलाइटचा (Satellite) वापर केला जाईल आणि त्याच्याच मदतीने वापरकर्त्यांना स्वस्तात ब्रॉडबँड (Broadband) कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सॅटेलाइटपासून वापरकर्त्यापर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी मल्टी-ऑर्बिट स्पेस नेटवर्कचा वापर केला जाईल. रिलायन्स जिओने सॅटेलाइटद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एसईएस (SES) सोबत भागीदारी केली आहे. या नेटवर्कमध्ये जियोस्टेशनरी आणि मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटचा वापर केला जाईल. या नेटवर्कच्या मल्टी गिगाबाईट लिंकच्या मदतीने भारतातील उद्योग, मोबाईल आणि सर्वसामान्य जनता आणि भारताच्या शेजारील देशांनाही जोडता येणार आहे. यात जिओची आणि एसईएसची 49 टक्के भागीदारी आहे.

जिओने केलेल्या या कराराच्या मदतीने, जिओ पुढील काही वर्षांत 100 मिलियन अमेरिकन डॉलर्स गेटवे आणि उपकरणे खरेदी करेल. तसेच, एसईएस आपले आधुनिक सॅटेलाइट देणार आहे. कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी ब्रॉडबँडचा वापर आवश्यक आहे. भारतातील दुर्गम ठिकाणी परवडणारे इंटरनेट आणण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला रोखण्यासाठी पहिल्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा महागड्या ब्रॉडबँडमुळे अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे जिओ व एसईएसच्या हा नवा उपक्रम पंतप्रधानांच्या ‘गती शक्ती: नॅशनल मास्टर प्लॅन फॉर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी’ला पुढे नेण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे दोन्ही कंपन्यांचे म्हणणे आहे.

5G मध्येही गुंतवणूक : अंबानी

दरम्यान, जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले की, फायबर आधारित कनेक्टिव्हिटी आणि एफटीटीएच व्यवसायासह 5G मध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले जाणार आहे. दुसरीकडे, एसईएससोबतचा हा नवीन संयुक्त उपक्रम मल्टीगिगाबीट ब्रॉडबँडच्या वाढीला आणखी गती देणार आहे.

इतर बातम्या

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, फोनमध्ये काय असेल खास?

Electric And Hybrid Vehicles : इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या मागणीत वाढ, डेलॉइटच्या अहवालातून माहिती समोर

OnePlus Nord CE 2 5G हा मोबाईल 17 फेब्रुवारीला होणार लाँच, जाणून घ्या महत्त्वाचे फीचर्स

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें