
Oppo Find X9 या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचनंतर कंपनीने मागील जनरेशनचा फ्लॅगशिप मॉडेल Oppo Find X8 Pro वर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. तर हा फोन ग्राहकांसाठी मोठ्या सवलतीत विकला जात आहे. हा फोन आता जुना झाला असला तरी, त्याचा पॉवरफूल प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा, दीर्घ बॅटरी लाइफ आणि प्रीमियम डिझाइन यामुळे वापरकर्त्यांना उत्तम अनुभव देत आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की ओप्पोचा हा स्मार्टफोन सवलतीनंतर कोणत्या किमतीत खरेदी करता येईल.
हा ओप्पो स्मार्टफोन 99 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 84 हजार 999 रूपयांमध्ये विकला जात आहे. याचा अर्थ असा की हा स्मार्टफोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा चक्क 15 हजार रूपयांच्या कमी किमतीत विकला जात आहे. जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस/एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही यावर 4 हजार रूपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकता. शिवाय जर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन हा फोन खरेदी केला तर यावर एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.
हा फोन Apple iPhone 16 Plus, Samsung Galaxy S25 Plus 5G, Apple iPhone 17 आणि Google Pixel 10 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतो.
डिस्प्ले: या ओप्पो स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाची AMOLED स्क्रीन आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते.
चिपसेट: हा फ्लॅगशिप फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 प्रोसेसरने चालवला आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 5910 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 80 W फास्ट चार्जिंग आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 -मेगापिक्सेल सोनी LYT808 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल सोनी LYT600 पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. 6x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल सोनी IMX858 सेन्सर आणि 120x डिजिटल झूमसह 50-मेगापिक्सेल सॅमसंग अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.