लाँच होण्याआधीच Oppo Find X9sची किंमत, फिचर्स झाली लीक, जाणून घ्या
Oppo Find X9s लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. मात्र लाँच होण्याआधीच या हँडसेटची किंमत आणि फिचर्स लीक झाली आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या नवीन फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

ओप्पो कंपनीचा Oppo Find X9s लवकरच भारतीय बाजारात सादर होणार आहे. पण लाँच होण्याआधीच या आगामी स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स विषयी माहिती लीक झाली आहे. असे समोर आले आहे की हा फोन जागतिक वर्जन भारतात किंचित कमी किमतीत लाँच होऊ शकतो. 21 मे रोजी लाँच होणारा हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. एका टिपस्टरने अलीकडेच या फोनच्या किंमतीची माहिती शेअर केली आहे. चला तर मग लीक झालेल्या महितीनुसार Oppo Find X9s या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
Oppo Find X9s Price in India
टिपस्टर यांच्या दाव्यानुसार या ओप्पो स्मार्टफोनची किंमत 79 हजार 999 रूपयांपासून सुरू होऊ शकते. ही किंमत हँडसेटच्या जागतिक किंमतीपेक्षा किंचित कमी आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा फोन मलेशियामध्ये MYR 3599 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 85 हजार रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाला होता. हे निश्चित झाले आहे की, दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाइट, तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
Oppo Find X9s Specifications
भारतीय वर्जनमध्ये जागतिक वर्जनसारखीच फिचर्स असण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर या ओप्पो फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1800 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i सह 6.59-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत या फोनमध्ये सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
Oppo Find X9s ची फिचर्स
भारतीय बाजारात लाँच झालेल्या व्हेरिएंटमध्ये 3nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9500s प्रोसेसर असेल. फोनला 7025mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी पॉवर देण्यात आली असल्याची शक्यता आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फोनमध्ये हॅसलब्लॅड-ट्यून केलेली ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टीम असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ColorOS 16 वर चालेल.