AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 14 हजारांच्या रेंजमध्ये OPPO चा शानदार स्मार्टफोन बाजारात, डिस्काऊंटसह सेल सुरु

ओप्पो इंडियाने (Oppo India) आपला शानदार स्मार्टफोन ओप्पो के 10 (Oppo K10) भारतात लॉन्च केला आहे. K10 हा ओप्पोचा भारतात लाँच झालेला पहिला K-सिरीज स्मार्टफोन आहे, जो चीनमध्ये बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे.

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 14 हजारांच्या रेंजमध्ये OPPO चा शानदार स्मार्टफोन बाजारात, डिस्काऊंटसह सेल सुरु
OPPO K10 Image Credit source: Twitter / Oppo
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 29, 2022 | 2:44 PM
Share

मुंबई : ओप्पो इंडियाने (Oppo India) आपला शानदार स्मार्टफोन ओप्पो के 10 (Oppo K10) भारतात लॉन्च केला आहे. K10 हा ओप्पोचा भारतात लाँच झालेला पहिला K-सिरीज स्मार्टफोन आहे, जो चीनमध्ये बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. लॉन्चच्या अगोदर, Oppo ने K10 चे काही टीझर सादर केले होते. हा फोन मोठा डिस्प्ले, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, एक्सपेंडेबल रॅम सपोर्ट आणि फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीसह येतो. Oppo ने पुष्टी केली आहे की K10 हा 4G फोन आहे. OPPO K10 स्मार्टफोन भारतात 14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. लिव्ह विदाऊट लिमिट्स (Live Without Limits) या टॅगलाइनसह हा फोन सादर करण्यात आला आहे.

OPPO K10 ची विक्री आजपासून (29 मार्च) सुरू होत आहे. दुपारी 12 वाजता या फोनचा सेल सुरु होईल. हा फोन ग्राहक Flipkart सह काही निवडक रिटेल आउटलेट्स आणि Oppo ऑनलाइन स्टोअरवरुन खरेदी करु शकतात. यासोबतच फोनच्या खरेदीवर काही उत्तम ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. तुम्ही SBI कार्डधारक असाल तर तुम्हाला फोनवर 2,000 रुपयांची सवलत मिळू शकते. फोनशी संबंधित उर्वरित ऑफर्स फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून पाहता येतील. फोनवर 3 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ची ऑफरदेखील दिली जात आहे.

ऑफर्स

फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करताना तुम्ही Bank Of Baroda चं Credit Card वापरुन पेमेंट केलंत तर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. एसबीआय क्रेडिट, क्रेडिट ईएमआय आणि डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांसह हा फोन खरेदी करताना तुम्हाला 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळू शकतो.

OPPO K10 चे स्पेसिफिकेशन्स

    1. फोनमध्ये 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे, जी 1 टीबी पर्यंत वाढवता येते.
    2. स्मार्टफोन 16.74 सेमी (6.59 इंच) फुल एचडी + डिस्प्लेसह येतो.
    3. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo K10 च्या बॅक पॅनलवर 50MP + 2MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा उपलब्ध आहे आणि समोर 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.
    4. OPPO K10 चा 16MP AI सेल्फी कॅमेरा HDR ला सपोर्ट करतो आणि ब्राइट सेल्फ-पोर्ट्रेटसाठी 360° फिल लाइटसह येतो. हा कॅमेरा व्हिडीओ, नाईट, पॅनोरामिक, पोर्ट्रेट, टाइम-लॅप्स, टेक्स्ट स्कॅनर आणि स्टिकर सारख्या मोडला सपोर्ट करतो.
    5. OPPO K10 स्मार्टफोनच्या 6+128GB व्हेरिएंटची किंमत 14,990 रुपये आणि 8+128GB व्हेरिएंटची किंमत 16,990 रुपये आहे.
    6. फोनमध्ये 33W SuperVOOC चार्जिंग फीचरसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. हा फोन 5 मिनिटांच्या चार्जिंगसह 3 तास 38 मिनिटांचा कॉलिंग टाईमसह येतो.
    7. OPPO K10 च्या पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात पॉवरफुल Qualcomm® Snapdragon™ 680 प्रोसेसर आहे जो युजर्सना सर्वोत्तम अनुभव देतो. या फोनमध्ये 5G सपोर्ट मिळणार नाही.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.