Poco M8 5G भारतात लाँच होण्याची तारीख निश्चित, 50MP कॅमेऱ्यासह करेल धमाल
हा नवीन Poco फोन लवकरच भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच होणार आहे. कंपनीने या Poco फोनच्या लाँच तारीख लाँच केली आहे. चला तर पोकोच्या या फोनबद्दल अधिक जाणून घेऊयात.

पोको पुढील आठवड्यात त्यांच्या M सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने Poco M8 5Gच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केली आहे. अधिकृत लाँचिंगपूर्वी फ्लिपकार्टवर एक समर्पित मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे, जी फोनच्या डिझाइन आणि प्रमुख वैशिष्ट्यांची पुष्टी करते. मायक्रोसाइट असेही सूचित करते की हा फोन अधिकृत लाँचिंगनंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. लाँचिंग तारखेबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 8 जानेवारी 2026 रोजी ग्राहकांसाठी लाँच केला जाईल.
Poco M8 5G स्पेसिफिकेशन्स (पुष्टी)
फ्लिपकार्टवरील एका मायक्रोसाईटद्वारे फोनची रचना उघड करण्यात आली आहे. जर तुम्ही इमेज बारकाईने पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेल एआय कॅमेरा सिस्टम आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 7.35 मिमी अल्ट्रा-स्लिम डिझाइन असेल आणि त्याचे वजन 178 ग्रॅम असेल.
Poco M8 5G अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
पोकोचा हा येणारा फोन रेडमी नोट 15 5जीचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. जर खरे असेल तर, त्यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय प्रोटेक्शन अपेक्षित आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या पोको स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट, 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असू शकते.
या रेडमी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5020mAh ची पॉवरफूल बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 18W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील असू शकतो.
Poco M8 5G ची भारतात अपेक्षित किंमत
या पोको मोबाईल फोनची किंमत अद्याप उघड झालेली नाही.Poco M8 5G या वर्षाच्या सुरुवातीला भारतात 9 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. अपग्रेडेड व्हर्जनच्या किमतीबाबत कोणतीही लीक झालेली नाही.
