पोकोची नवीन सिरीज भारतात घेणार धमाकेदार एँट्री, मोठ्या स्क्रीनसह मिळणार मोठी बॅटरी

पोकोच्या नवीन सिरीजच्या लाँचची तारीख जाहीर झाली आहे. या सिरीजमध्ये पोकोच्या या स्मार्टफोनचा समावेश असण्याची शक्यता आहे, ज्यात मोठी बॅटरी आणि प्रभावी डिस्प्ले असतील. लाँच झाल्यानंतर ही सिरीज फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला तर मग या सिरीज बद्दल अधिक जाणून घेऊयात.

पोकोची नवीन सिरीज भारतात घेणार धमाकेदार एँट्री, मोठ्या स्क्रीनसह मिळणार मोठी बॅटरी
poco phone
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2026 | 9:38 PM

पोकोची नवीन सी सीरीज लवकरच भारतीय बाजारात सादर होणार आहे. तर कंपनीने नवीन फोन सी सीरीजच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. तर कंपनीच्या एका पोस्टद्वारे या स्मार्टफोनची तारीख घोषित केली आहे. त्या सोबत असेही कळवण्यात आले आहे की ही नवीन सीरीज मोठ्या बॅटरी आणि मोठ्या स्क्रीनसह येऊ शकते. कंपनीने पोस्टसोबत शेअर केलेल्या पोस्टरवरून हे स्पष्ट होते की, यामध्ये 6300mAh बॅटरी असेल. पोस्टरमध्ये C81 सीरीजचा उल्लेख आहे, याचा अर्थ या सीरीजमध्ये पोको C81 आणि पोको C81x लाँच केले जाऊ शकतात. चला तर मग या फोनची लाँच तारीख आणि उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात.

पोको C81 सिरीज भारतात लाँच होण्याची तारीख

पोको कंपनीने पुष्टी केली आहे की ही सिरीज 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. अधिकृत लाँच झाल्यानंतर हे फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. टीझर पोस्टनुसार या सिरीज सेगमेंटसाठी डिझाइन सामान्य आहे. या फोनमध्ये मॅट फिनिश, फिकट निळा रंग आणि उभ्या मांडणीतील ड्युअल-कॅमेरा मॉड्यूल आहे. याची रचना गेल्या आठवड्यात भारतात 11 हजार 499 रूपयांमध्ये लॉन्च झालेल्या Redmi A7 Pro सारखीच आहे.

पोको C81 फोनबद्दल माहिती

पोको C81 मध्ये 6300mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी पोको C71 मधील 5200mAh क्षमतेच्या बॅटरीपेक्षा सुमारे 20 टक्के मोठी आहे. कंपनीचा दावा आहे की 1000 चार्ज सायकलनंतर बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत टिकेल. यात कोल्ड एंड्युरन्स मोड देखील आहे, जो कमी तापमानाच्या परिस्थितीत कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि या सेगमेंटमधील हे एक वैशिष्ट्यपूर्ण फीचर आहे. चार्जिंग 15W इतके माफक आहे, परंतु फोनमध्ये 7.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधा देखील आहे, ज्यामुळे गरज पडल्यास लहान डिव्हाइसेसना पॉवर देता येते.

Follow Us