AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहासोबत लग्न करून आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ घेणाऱ्या आंचलच्या जीवाला धोका, थेट धक्कादायक खुलासा..

Nanded News : नांदेडच्या सक्षम ताटे याच्या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली. मात्र, हे प्रकरण इथेच थांबले नाही. सक्षमच्या कुटुंबियांकडून मोठा खुलासा करण्यात आला. सक्षमचे घर सोडून आंचल तिच्या घरी गेली. आता आंचल हिने हैराण करणारा दावा केलाय.

मृतदेहासोबत लग्न करून आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ घेणाऱ्या आंचलच्या जीवाला धोका, थेट धक्कादायक खुलासा..
Saksham Tate case Aanchal Mamidwar
| Updated on: Jun 15, 2026 | 11:17 AM
Share

नांदेडचा सक्षम ताटे याला थेट गोळ्या झाडून प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावाने ठार केले. सक्षमची हत्या केल्याची कोणत्याही कल्पना आंचल हिला नव्हती. तिला जसेही समजले की, आपल्या प्रेम संबंधाबद्दल कळताच सक्षमची हत्या आपल्या कुटुंबियांनी केली, तशीच धाव आंचल हिने सक्षमच्या घरी घेतली. सक्षमची आई पोलिस स्टेशनमध्ये दिसताच आंचल मामीडवार त्यांना पकडून रडली. यासोबतच आयुष्यभर तुमचा मुलगा म्हणून तुमच्या घरी राहिल आणि काळजी घेईल, असे तिने म्हटले. त्यानंतर आंचल मामीडवार हिने थेट सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न केले. हळद लावून घेतली. या घटनेची देशभरात चर्चा रंगली. कारण आंचल ही पहिली प्रेयसी असेल जिने आपल्या प्रियकराच्या निधनानंतर त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून आयुष्यभर त्याची विधवा म्हणून राहण्याची शपथ घेतली. आंचल ही आपल्या आई-वडील आणि भावांना शिक्षा देण्याची मागणीही त्यावेळी करताना दिसली.

आंचल मामीडवार हिने साडेतीन महिन्यापूर्वीच सक्षम ताटे याचे घर सोडले. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. आयुष्यभर तुमच्या घरी राहून तुमची काळजी घेईल, अशी म्हणण्याची आंचल काही महिन्यातच आपल्या आई वडिलांच्या घरी परतली. यादरम्यान तिने सक्षमच्या लहाना भाऊ याच्यावर आरोप केले. तो आपल्यासोबत चुकीचे वागत होता आणि अनेकदा त्याने चुकीचे स्पर्श केल्याचे तिने म्हटले.

यानंतर सक्षम ताटे याच्या आईनेही काही आरोप केले. आंचल हिने केलेल आरोप सापपणे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. तिला वाटले ती तिच्या मनाने आली आणि ती तिच्या मनाने परत गेली. तिच्या मनात नक्की काय होते, हे आम्हाला माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले. यादरम्यानच आता एका न्यूज चॅनलवर बोलताना आंचल मामीडवार हिने धक्कादायक खुसाला केला.

आंचल मामीडवार हिने म्हटले की, माझ्या जिवाला धोका आहे. सक्षम ताटे याच्या दोन ते तीन मित्रांकडून मला जिवे मारण्याची धमकी दिले जाते. याबाबत मी पोलिसांना माहिती दिली आहे. आंचल मामीडवार हिने केलेल्या आरोपाने खळबळ उडाली. आंचल मामीडवार हिने सक्षमच्या भावावर आरोप करत पोलिसांच्या परवानगीने त्याचे घर सोडले. तिचे आई वडील जेलमध्ये असून ती तिच्या लहान्याभावासोबत आई वडिलांच्या घरी राहते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी