AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा पक्ष आमच्यात विलिन करा, शरद पवारांना कुणी दिली ऑफर? म्हणाले, आमचा पक्ष मोठा भाऊ…

NCP Merger With Congress : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनकरण होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, एका बड्या नेत्याने शरद पवार यांना विलिकरणाची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. आता हा बडा नेता कोण आहे? नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या..

तुमचा पक्ष आमच्यात विलिन करा, शरद पवारांना कुणी दिली ऑफर? म्हणाले, आमचा पक्ष मोठा भाऊ...
Sharad pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 15, 2026 | 11:22 AM
Share

सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध घडामोडी समोर येताना दिसत आहेत. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रस्ताव काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या पक्षाला मिळाला असल्याचा दावा केला जात आहे. असे असताना आता आणखी एका नेत्याने शरद पवार यांना मोठी ऑफर दिल्याचे समोर आले आहे. आता ही ऑफर काय आहे? नेमकं कुणी दिली? वाचा सविस्तर…

कुणी दिली शरद पवारांना ऑफर?

राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे. “शरद पवार गट काँग्रेसमध्ये गेल्यास ते डुबत्या नावेत बसल्यासारखे आहे. पवार गट कॅाग्रेसमध्ये जाऊन काही फायदा नाही. आमचा पक्ष मोठा भाऊ, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार गटाने विलीन व्हावं. सुनेत्रा ताई यांच्या नेतृत्वात पवार गटाने एकत्र यावं” असे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, “जंगलातील नक्षलवाद संपला, पण शहरी नक्षलवादाचं मोठं आव्हान. शहरी नक्षलवाद जिथून उगम होतो, तेथेच शहरी नक्षलवाद थांबावयला हवा. सरकार विरोधी आंदोलनात शहरी नक्षलवादी सक्रिय. गडचिरोलीतंही शहरी नक्षलवादी डोकं वर काढत आहे.”

कॉकरोच जनता पार्टीबाबत मोठे वक्तव्य

सध्या देशात चर्चेत असणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीविषयी देखील धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठे विधान केले आहे. ‘उद्याच्या नागपुरातील कॅाक्रोच जनता पक्षात आंदोलनात शहरी नक्षलवादी असण्याची शक्यता. तरुणांची डोकी भडकवण्याचं काम शहरी नक्षलवादी करत आहेत’ असे ते म्हणाले.

विलिनीकरणावार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

माध्यमांशी बोलताना सुप्रिय सुळे म्हणाल्या की, आमदार, खासदार किंवा अन्य कोणाशाही कोणीच संपर्क केलेला नाही. आम्हीदेखील कोणाशी संपर्क केलेला नाही. तसेच विलीनीकरणाची ही चर्चा कुठून सुरू झाली, चर्चा कोणी सुरू केली याची कल्पना मला नाही. पुढे त्यांनी कोण कुणाच्या संपर्कात नाहीये याची मला कल्पना नाही. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शरद पवार यांनीदेखील कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही, असेही थेट स्पष्ट केले.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले