AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत पोर्टेबल AC घ्या, ऑफर जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटच्या डीलविषयी माहिती सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून AC घेण्याचा तुमचा विचार असेल तर ही माहिती नक्की वाचा. तुम्हाला स्वत:साठी AC खरेदी करायचा असेल पण बजेट तुम्हाला साथ देत नसेल तर काळजी करू नका. हा AC फक्त 10,000 रुपयांमध्ये येईल आणि तुमची खोली थंड बनवेल. तुम्ही ते कोठूनही ऑनलाइन खरेदी करू शकता. जाणून घ्या.

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत पोर्टेबल AC घ्या, ऑफर जाणून घ्या
Portable mini ac price 10000 remote control and touch screen Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 16, 2025 | 9:35 PM
Share

उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून लोकांची कूलर, फॅन, AC घेण्याची लगबग सुरू झाली आहे. तुम्ही तुमच्या घरात AC बसवण्याचा विचार करत असाल पण खर्चाची भीती वाटत असेल तर हा AC तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. या AC च्या माध्यमातून तुमच्या खोलीतून उष्णता पूर्णपणे नाहीशी होईल.

तुमची खोली थंडगार असावी, असं वाटत असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. या AC चा आकार एकदम कॉम्पॅक्ट असून त्याचे वजन जास्त नाही. तसेच इतर सामान्य AC च्या तुलनेत खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. यामुळे खोली सहज आणि पटकन थंड होऊ शकते.

पोर्टेबल मिनी AC हा AC तुम्ही अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ठिकाणी ऑनलाइन मिळवू शकता. पण अॅमेझॉनवरून डिस्काउंटसह फक्त 9,999 रुपयांत खरेदी करू शकता. जर तुम्हाला EMI वर खरेदी करायचे असेल तर प्लॅटफॉर्म तुम्हाला हा पर्याय देत आहे. यामध्ये मासिक EMI तुम्हाला 485 रुपये लागणार आहे. हिवाळ्यातही हे हीटर काम करू शकते. बाकी AC सारखा फारसा वाटत नाही.

VICARI एअर कंडिशनर हा पर्सनल AC तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. 80 टक्के सूटवर केवळ 497 रुपयांत मिळू शकते. बरं, ते कूलरसारखं काम करतं. पण AC जेवढी थंडी करू शकते, तेव्हढी यात क्षमता आहे.

Daikin 1 Ton 3 Star इन्व्हर्टर स्प्लिट AC एक टन इन्व्हर्टर स्प्लिट AC तुम्हाला 33,490 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळू शकतो. हा 3 Star AC आहे. ज्यामुळे तुमची खोली काही मिनिटांत थंड होऊ शकते. यापेक्षा जास्त क्षमतेचा AC ही तुम्ही खरेदी करू शकता.

MarQ by Flipkart 2025 AC 0.7 टनाचा हा 3Star स्प्लिट AC फ्लिपकार्टवर 20,990 रुपयांना उपलब्ध आहे. पण जर तुम्ही EMI वर खरेदी करत असाल तर तुम्ही 36 महिन्यांचा EMI प्लॅन घेऊ शकता. यामध्ये दरमहा फक्त 738 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. यामुळे तुम्हाला एकाच वेळी जास्त पैसे खर्च होणार नाहीत आणि तुमच्या घरात AC ही लावण्यात येणार आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.