Realme चा 64MP क्वॉड कॅमेरा स्मार्टफोन, सर्वातआधी भारतात लाँच होणार!

| Updated on: Jun 24, 2019 | 6:14 PM

स्मार्टफोन कंपनी Realme 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून Realme च्या चाहत्यांना Realme X या स्मार्टफोनची प्रतिक्षा होती. त्यामुळे आता कंपनीने या नव्या फोनची घोषणा केल्याने Realme च्या चाहत्यांची एक्साईटमेंट आणखी वाढली आहे.

Realme चा 64MP क्वॉड कॅमेरा स्मार्टफोन, सर्वातआधी भारतात लाँच होणार!
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन कंपनी Realme 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून Realme च्या चाहत्यांना Realme X या स्मार्टफोनची प्रतिक्षा होती. त्यामुळे आता कंपनीने या नव्या फोनची घोषणा केल्याने Realme च्या चाहत्यांची एक्साईटमेंट आणखी वाढली आहे. Realme आपला पहिला 64 मेगापिक्सल कॅमेरा असेलला स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. इंडियाचे संचालक माधव सेठ यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली.


माधव सेठ यांनी याबाबत ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये माधव सेठ यांनी या स्मार्टफोनचं नाव जाहीर केलेलं नाही. मात्र, त्यांनी या स्मार्टफोनला ‘new premium killer’ म्हणून संबोधलं. Realme चा हा स्मार्टफोन सॅमसंगच्या 64 मेगापिक्सल GW1 सेन्सरसोबत येईल. यामध्ये 1.6 मायक्रॉनचा पिक्सल साईज देण्यात आला आहे. सेठ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कॅमेरा सॅम्पल देण्यासाठी एक फोटोही शेअर केला.

या फोटोमध्ये खालच्या बाजूने एक वॉटरमार्क दिसतो आहे. हा वॉटरमार्क ’64MP AI Quad Camera’ चा आहे. यावरुन हे निश्चित होतं की Realme च्या या नव्या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे असणार आहेत. चार कॅमेरे असलेला Realme चा हा पहिला स्मार्टफोन असेल.

कॅमेरा व्यतिरिक्त या स्मार्टफोनबाबत सध्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने Realme-2 ला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केलं होतं. त्यानंतर Realme-2 Pro ला सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आलं होतं. त्यामुले Realme चा हा नवा स्मार्टफोनही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. हा स्मार्टफोन  Realme 4 आणि Realme 4 Pro या नावांनी लाँच केला जाऊ शकतो. Realme ही 64 मेगापिक्सल कॅमेरा असेलला फोन बनवणारी पहिली कंपनी आहे.