
मुंबई : Realme ने भारतात वार्षिक इयर एंड सेलची घोषणा केली आहे. सेल 26 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 30 डिसेंबरपर्यंत चालेल. हा सेल realme.com आणि Flipkart वर देखील आयोजित केला जाईल. अनेक Realme स्मार्टफोन या सेल दरम्यान सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. Realme C-series, Narzo सीरीज स्मार्टफोन्स सोबत realme हँडसेट, realme GT Neo 2 5G सारखे प्रीमियम फ्लॅगशिप डिव्हाईसेस कमी किंमतीत खरेदी करता येतील. रियलमीच्या स्मार्टफोन्सवर 500 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. (Realme annual Year End Sale : get upto 4000 rs discount on Narzo and GT series)
Realme च्या इयर एंड सेल दरम्यान, फ्लॅगशिप Realme GT Neo 2 5G 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होईल. तर 12GB + 256GB स्टोरेज असलेल्या हाय-एंड मॉडेलची किंमत 35,999 रुपये असेल. त्याचप्रमाणे, Realme GT मास्टर एडिशन सेल दरम्यान 4000 रुपये कमी किंमतीत उपलब्ध होईल. यासह, फोनचा 6GB + 256GB स्टोरेज वेरिएंट 25,999 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज पर्याय 27,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 29,999 रुपये असेल.
इतर बातम्या
WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन
Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं
गुगल मॅप्सचं Area Busy फीचर, कोरोना काळात तुम्हाला गर्दीपासून दूर राहण्यासाठी मदत करेल
(Realme annual Year End Sale : get upto 4000 rs discount on Narzo and GT series)