मोबाईलनंतर Realme च्या Smartwatch चा धुमाकूळ, देशात सर्वाधिक विक्री

| Updated on: Nov 13, 2020 | 11:26 PM

रियलमी कंपनी उत्तमोत्तम स्मार्टफोन्स आणि अॅक्सेसरीजच्या जोरावर भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

मोबाईलनंतर Realme च्या Smartwatch चा धुमाकूळ, देशात सर्वाधिक विक्री
Follow us on

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी रियलमी (Realme) उत्तमोत्तम स्मार्टफोन्स आणि अॅक्सेसरीजच्या जोरावर भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. रियलमीने आधी स्मार्टफोन मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आणि आता स्मार्टवॉचच्या (Smartwatch) विक्रीतही रियलमीने इतर कंपन्यांना मागे टाकले आहे. (Realme becomes top smartwatch seller in India in september )

रियलमी कंपनीने सप्टेंबर महिन्यात भारतात सर्वाधिक स्मार्टवॉचची विक्री केली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनने (IDC) वियरेबल्स डिव्हाईसच्या मासिक विक्रीबाबतचा एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात भारतात जितक्या स्मार्टवॉचची विक्री झाली आहे, त्यात रियलमीचा वाटा सर्वात मोठा आहे. देशातील एकूण विक्रीपैकी 22.1 टक्के स्मार्टवॉच रियलमीचे होते.

मार्केटमध्ये रियलमीचा हिस्सा वाढला

मागील सहा महिन्यांमध्ये रियलमीच्या स्मार्टवाचच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये रियलमीच्या शिपमेंटमध्ये लागोपाठ दुसऱ्या तिमाहीत मोठी वाढ दिसून आली आहे. स्मार्ट वियरेबल्स मार्केटमध्ये एप्रिल ते जून दरम्यान रियलमीचा 21.3 टक्के हिस्सा होता, तर जुलै ते सप्टेंबरमध्ये कंपनीचा हिस्सा 22.1 टक्के इतका होता.

विक्री वाढण्याचे कारण काय?

रियलमीच्या स्मार्टवॉचच्या विक्रीत वाढ होण्यामागे कमी किंमत आणि जबरदस्त फिचर ही दोन प्रमुख कारणं आहेत. कंपनी सातत्याने कमी किंमतीत स्मार्टवॉच लाँच करत आहे आणि ते स्मार्टवॉच लोकांच्या पसंतीसही उतरत आहेत. रियलमीच्या स्वस्तातल्या Realme Fashion Watch पासून महागडच्या Realme Classic Watch पर्यंत सर्वच स्मार्टवॉचना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.

जबरदस्त बॅटरी आणि फिचर्स असलेला Timex चा फिटनेस बँड लाँच

स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड बनवू लागल्यानंतर आता घड्याळ बनवणाऱ्या कंपन्याही स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड लाँच करुन मार्केटमध्ये उतरत आहेत. Timex कंपनीने नुकताच एक स्मार्ट फिटनेस बँड (Fitness Band) लाँच केला आहे. या फिटनेस बँडमध्ये पाच दिवसांचा बॅटरी बँकअप देण्यात आला आहे. तसेच सिलिकॉन स्ट्रॅपही देण्यात आली आहे. टायमेक्सच्या या फिटनेस बँडची किंमत 4 हजार 495 रुपये इतकी आहे.

टायमेक्सच्या या स्मार्ट बँडमध्ये तुम्हाला 2.4 cm चा कलर टच डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग, म्युझिक कंट्रोल, हार्ट रेट मॉनिटर आणि नोटिफिकेशन अलर्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्ट बँडमध्ये पाच दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

हा बँड अलॉय केस, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉन स्ट्रॅपसह उपलब्ध आहे. युजर्स दोन कलर व्हेरिएंटमध्ये हा बँड खरेदी करु शकतात. रोज गोल्ड आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्ट बँड उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

तुमच्या फोनमधून ‘हे’ अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील

WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण

(Realme becomes top smartwatch seller in India in september)