64MP कॅमेरासह Redmi चा पहिला गेमिंग स्मार्टफोन लाँच, किंमत…

| Updated on: Apr 28, 2021 | 10:13 PM

रेडमीने (Redmi) अखेर आपला पहिला गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Redmi K40 Gaming Edition असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

64MP कॅमेरासह Redmi चा पहिला गेमिंग स्मार्टफोन लाँच, किंमत...
Redmi K40 Gaming Edition
Follow us on

मुंबई : रेडमीने (Redmi) अखेर आपला पहिला गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रेडमी के 40 गेमिंग एडिशन (Redmi K40 Gaming Edition) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा फोन 30 एप्रिलपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फोनची सुरुवातीची किंमत 23,000 रुपये आहे, ज्यामध्ये आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बेस मॉडेल मिळेल. आपल्याला टॉप एंड मॉडेल म्हणजेच 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 31,000 रुपये मोजावे लागतील. (Redmi launches its first ever gaming phone, Redmi K40 Gaming Edition, with 64MP Camera)

हँडसेट 6GB + 128GB, 8GB + 128GB, आणि 12GB+ 128GB अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. . रेडमीने या फोनचं खास ब्रुस ली एडिशनही बाजारात सादर केलं आहे, जे 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेजसह सादर केलं आहे. रेडमी के 40 गेमिंग एडिशनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे जो एचडीआर 10 + सपोर्ट, 10 बिट कलर, DCI- P3 कव्हरेज, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह येतो.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, फोन अँड्रॉइड 11 वर चालतो. तथापि, हा गेमिंग फोकस्ड फोन आहे. म्हणूनच, त्यात आधीपासूनच शोल्डर बटण देण्यात आली आहेत जी ट्रिगर म्हणून ओळखली जातात. कॅमेरा पॅनेलच्या मागील बाजूस असलेली रिम वेगवेगळ्या नोटिफेकशनवर रंग दर्शवते. त्याच वेळी, लाईट कॉल, मेसेजिंग आणि चार्जिंगसह देखील कार्य करते. शाओमीने म्हटले आहे की, हा एक दमदार गेमिंग फोन आहे ज्यामध्ये तुम्हाला गेमिंग टेक्नोलॉजी देखील मिळते.

दमदार कॅमेरा

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या इतर फीचर्सविषय़ी बोलायचे झाल्यास यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट रीडर, X एक्सिस लिनल वायब्रेशन मोटर आहे. व्हीसी लिक्विड कूल टेक्नॉलॉजी + व्हाइट ग्रेफीन, ड्युअल 5 जी स्टँडबाय, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, डॉल्बी अॅटमॉस देण्यात आले आहेत. फोन ब्लॅक, सिल्व्हर आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. दरम्यान, हा फोन भारतात कधी लाँच होईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि आत्तापर्यंतच्या बेस्ट कॅमेरासह Mi 11 Ultra लाँच, किंमत…

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच

(Redmi launches its first ever gaming phone, Redmi K40 Gaming Edition, with 64MP Camera)