AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUBG ला टक्कर देणाऱ्या FAU-G गेमसाठी असं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

FAU-G (Fearless and United Guards) हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. 30 नोव्हेंबरपासून कंपनीकडून हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आला आहे

PUBG ला टक्कर देणाऱ्या FAU-G गेमसाठी असं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 06, 2020 | 3:01 PM
Share

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. PUBG Mobile या गेमवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) FAUG (Fearless and United Guards) नावाच्या गेमचा टीझर शेअर केला होता. (Register on Android phone for FAU-G game that compete with PUBG; Learn step by step process)

हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. 30 नोव्हेंबरपासून कंपनीकडून हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आला आहे. मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10.6 लाख युजर्सनी प्री-रजिस्ट्रेशन केले. अजूनही हजारो लोक रजिस्ट्रेशन करत आहेत.

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. FAU-G (Fearless and United Guards) हा गेम गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

प्री-रजिस्टर कसं कराल?

1. सर्वात आधी तुमच्या अंड्रॉयड फोनवरी गुगल प्ले स्टोर या अॅपवर जा आणि तिथे FAU-G असं सर्च करा. या गेमसाठी तुमच्या मोबाईलमधील अँड्रॉयड व्हर्जन 8 किंवा त्यापुढील असायला हवं.

2. FAU-G गेमचा पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करा. त्यानंतर खाली रजिस्ट्रेशनचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला प्री-रजिस्टर बटण दिसेल त्यावर क्लिक करा.

3. प्री-रजिस्टर बटणावर क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्यावरील ओके या पर्यायावर क्लिक करा.

कसा आहे गेम प्ले?

गुगल प्ले स्टोअरवर कंपनीने गेमसोबत काही फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये सैनिक लढताना दिसत आहेत. डोंगराळ प्रदेशात लढाई सुरु असल्याचे दिसत आहे. या गेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, FauG कमांडो अत्यंत धोकादायक सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि ते भारताच्या शत्रूंबरोबर युद्ध करतील. गेम-प्ले भारतीय सैन्याशी संबंधित आहे, असं प्ले स्टोरवरील फोटोंवरुन वाटतंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

अ‍ॅपल युजर्सना प्रतीक्षा

FAU-G हा मोबाइल गेम अद्याप लाँच झालेला नाही, हा गेम Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉयड युजर्ससाठीच येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु हा गेम अॅपल युजर्ससाठीदेखील लाँच केला जाईल अशीही चर्चा सुरु आहे. परंतु अॅपल युजर्सना या गेमसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कंपनीने हा गेम अद्याप अ‍ॅपलच्या App Store वर प्री-रजिस्ट्रेशन उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे हा गेम आधी अँड्रॉयड युजर्सच्या हाती पडणार आहे.

संबंधित बातम्या

पबजी फॅन्ससाठी खूशखबर! पुढील आठवड्यात PUBG Mobile India लाँच होण्याची शक्यता

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

(Register on Android phone for FAU-G game that compete with PUBG; Learn step by step process)

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?