भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

| Updated on: Dec 16, 2020 | 6:24 PM

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं नवी आकडेवारी जाहीर केली आहे (Reliance Jio tops mobile internet in India).

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर
Follow us on

मुंबई : भारतात मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत रिलायन्स जिओ अव्वल ठरलाय (Reliance Jio tops mobile internet in India). भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं ही नवी आकडेवारी जाहीर केलीय. ज्यामध्ये रिलायन्स जिओला डाऊनलोडींग स्पीडच्या बाबतीत अव्वल स्थान मिळालं आहे. 4 जी डेटा स्पीडच्या बाबतीत जिओ अव्वल आहे. डाऊनलोडच्या बाबतीत 20.7 MBPSचा सरासरी वेग जिओच्या इंटरनेटला असल्याचं ट्रायनं म्हटलंय. मात्र, डेटा अपलोडच्या बाबतीत वोडाफोननं जिओलाही मागे टाकलंय, आणि अव्वल स्थानावर बाजी मारलीय.

आता तुम्ही म्हणाल, डाऊनलोडींग आणि अपलोडींग स्पीडमध्ये काय फरक? तर डाऊनलोडींग स्पीड म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही इंटरनेटवर पाहता, वा डाऊनलोड करता, त्यावेळी इंटरनेटचा स्पीड किती मिळतोय? एखादी गोष्ट डाऊनलोड व्हायला किती वेळ लागतो? सर्वसामान्य मोबाईल यूजर सर्वाधिक डाऊनलोडच करत असतो. व्हिडीओ पाहणे, एखादी गोष्ट सर्च करणे वा एखादी गोष्ट डाऊनलोड करणं हेच सर्वसामान्य मोबाईल यूजर करत असतो. त्यावेळी त्याला डाऊनलोडींग स्पीडची गरज असते.

दुसऱ्या बाजूला जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला इंटरनेटवरुन दुसऱ्याला पाठवायची असते, यूट्यूब वा सोशल साईट्सवर एखादा व्हिडीओ पोस्ट करायचा असतो, वा ई-मेलद्वारे एखादी गोष्ट दुसरीकडे पाठवायची असते, त्यासाठी अपलोडींग स्पीड असणं गरजेचं असतं.

डाऊनलोडच्या बाबतीत जिओचा वेग हा वोडाफोनहून दुपटीहून अधिक आहे. मात्र, अपलोडींच्या बाबतीत वोडाफोननं जिओवर मात केलीय. काहीच दिवसांपूर्वी वोडाफोन आणि आयडीया या 2 मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या एकत्र झाल्या, मात्र ट्रायकडून अद्यापही दोन्ही कंपन्यांचे 4 जी इंटरनेट स्पीडचे आकडे वेगवेगळे दिले जात आहेत (Reliance Jio tops mobile internet in India).

ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार वोडाफोनला नोव्हेंबर महिन्यात 9.8 MBPSचा स्पीड मिळाला. तर आयडीया आणि भारती एअरटेलला 8.8 MBPSचा स्पीड मिळाला. जिओ सध्या 3.7 MBPSचा अपलोडींग स्पीड पुरवतोय. या बाबतीत वोडाफोन पुढं असल्याचं आकड्यांवरुन कळतंय.

हेही वाचा : फेसबूक आणणार नवा व्हिडीओ प्लॅटफॉर्म, सेलिब्रेटी,कंटेट क्रिएटर्ससोबत सेल्फी काढण्याची सोय