TikTok युजर्ससाठी आनंदाची बातमी, फेसबुककडून नवं ‘Collab’ अ‍ॅप लाँच

फेसबुकने TikTok प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देणारं अ‍ॅप लाँच केलं आहे. सुरुवातीला फेसबुकने हे अ‍ॅप प्रायोगिक तत्वावर सुरु केलं होतं.

TikTok युजर्ससाठी आनंदाची बातमी, फेसबुककडून नवं ‘Collab’ अ‍ॅप लाँच

वॉशिंग्टन : फेसबुकने TikTok प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देणारं अ‍ॅप लाँच केलं आहे. सुरुवातीला फेसबुकने हे अ‍ॅप प्रायोगिक तत्वावर सुरु केलं होतं. ‘Collab’ अंस या अ‍ॅपचं नाव असून आता फेसबुकने याचं अधिकृत लाँचिंग केलं आहे. या अ‍ॅपमध्ये युजर्सला अगदी सहजपणे आपले व्हिडीओ तयार करता येतात आणि या प्लॅटफॉर्मवर अपलोडही करता येतात. फेसबुकने सध्या हे अ‍ॅप iOS युजर्ससाठी उपलब्ध करुन दिलं आहे. सध्या तरी हे अ‍ॅप केवळ अमेरिकेत लाँच झालंय. त्यामुळे लवकरच हे जगातील इतर देशांमध्येही येण्याची शक्यता आहे (Facebook launches Collab Video App like TikTok ).

या अ‍ॅपमध्ये युजर्सला अनेक व्हिडीओ स्क्रोल करता येतात आणि आवडलेल्या व्हिडीओंना लाईकही करता येतं. युजर्स या अ‍ॅपवर म्युजिशियन्सलाही लाईक करु शकतात. असं केल्यास संबंधित व्यक्तीने नवा व्हिडीओ अपलोड केल्यास युजर्सला तात्काळ नोटिफिकेशन मिळेल. Collab मध्ये 3 प्रकारात व्हिडीओ असतील. त्यामुळे तुम्ही येथे स्वतःचा व्हिडीओ तयार करुन अपलोड करु शकता किंवा इतरांचे व्हिडीओ देखील पाहू शकता.

Collab वर सर्व व्हिडीयो पब्लिक राहतील. त्यामुळे कोणताही व्हिडीओ घेऊन तो दुसऱ्या व्हिडीओत टाकू शकता. यात जेव्हा कोणताही युजर एखादा व्हिडीओचा वापर करेल, तेव्हा त्या व्हिडीओच्या खऱ्या आर्टिस्टलाही याचं श्रेय देण्याची व्यवस्था आहे. Collab आपल्या युजर्सलाही आपले व्हिडीओ इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याची सुविधा देणार आहे. हे सर्व व्हिडीओ अ‍ॅपच्या वॉटरमार्कसह शेअर होतील.

फेसबुकने Collab बीटा अ‍ॅप मे महिन्यात अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केलं होतं. बीटा स्टेजमध्ये फेसबुकने अ‍ॅपच्या ऑडीयो सिंकिंगमध्ये काही बदल केले होते. सध्या Collab केवळ अमेरिकेतच आहे. याचा प्रतिसाद पाहता लवकरच इतर देशांमध्येही हे अ‍ॅप लाँच होऊ शकते.

हेही वाचा :

TikTok की Facebook? 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप कोणतं?

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

अमेरिकेत सत्ताबदल होताच TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका

Facebook launches Collab Video App like TikTok

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI