अमेरिकेत सत्ताबदल होताच TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका

अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्या एका आदेशाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

अमेरिकेत सत्ताबदल होताच TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 4:46 PM

वॉशिंग्टन : नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे जो बायडन (Joe Biden) 279 मते घेऊन विजयी झाले. तर ट्रम्प यांना अवघी 214 मतं मिळाली. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेतील प्रक्रियेनुसार जो बायडन 20 जानेवारी 2021 ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. या निवडणुकीद्वारे अमेरिकन जनतेने सत्ताबदल घडवून आणला आहे. दरम्यान, अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्या एका आदेशाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. (TikTok says it has filed petition in an appeals court to challenging a Trump administration order)

शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर बंदी आणण्यासाठी अमेरीकन सरकार सातत्याने प्रयत्न करत होतं. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत आदेश दिले होते की, 12 नोव्हेंबरपासून अमेरिकेत TikTok बॅन केलं जाईल. परंतु अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.

अमेरीकन सरकारच्या बंदीविरोधात TikTok ने कोर्टात ट्रम्प प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. तत्पूर्वी फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या TikTok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता TikTok नेही ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

ट्रम्प यांचे TikTok वर बंदीचे आदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करत शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधी ट्रम्प प्रशासनाने आदेशही दिले होते. तसेच यावेळी ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते की, TikTok हे अॅप युजर्सची खासगी माहिती साठवून ठेवत आहे. याचा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहे.

कोर्टाची ट्रम्प प्रशानाच्या निर्णयाला स्थगिती

पेन्सिलव्हेनियाच्या कोर्टाने ट्रम्प यांच्या TikTok वरील बंदीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. तीन क्रिएटर्सनी यासंबंधी याचिका दाखल केली होती. त्यावर फैसला सुनावताना न्यायाधीश वेंडी व्हिटलस्टोन म्हणाले होते की, TikTok वर बनवले जाणारे व्हिडीओ हे युजर्सचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

इतर देशातही TikTok Ban

शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर अमेरिकेसह अन्य काही देशांनी बंदी घातली आहे. त्यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. भारत सरकारने TikTok सह अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

संबंधित बातम्या

TikTok | …म्हणून टिकटॉकने हटवले 3.7 कोटी भारतीयांचे व्हिडीओ!

US Election 2020: ‘मेलानिया लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार’, माजी सहकाऱ्याचा दावा

जो बायडन यांच्या विजयाचा भारत अमेरिका मैत्रीला फायदा की तोटा?, बायडन- हॅरिस यांची जुनी वक्तव्यं काय सांगतात?

Joe Biden | जो बायडन यांच्या कार्यकाळात 5 लाख भारतीयांना मिळू शकते अमेरिकेचे नागरिकत्व

(TikTok says it has filed petition in an appeals court to challenging a Trump administration order)

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.