Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबूक आणणार नवा व्हिडीओ प्लॅटफॉर्म, सेलिब्रेटी,कंटेट क्रिएटर्ससोबत सेल्फी काढण्याची सोय

सुपर टूलचा वापर करुन लाईव्हस्ट्रीमदरम्यान पैसे देऊन क्रिएटर्ससोबत सेल्फी काढू शकतात. facebook super

फेसबूक आणणार नवा व्हिडीओ प्लॅटफॉर्म, सेलिब्रेटी,कंटेट क्रिएटर्ससोबत सेल्फी काढण्याची सोय
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 2:59 PM

वॉशिंग्टन : सोशल मीडिया कंपनी फेसबूक(Facebook) एक नवीन व्हिडीओ प्लॅटफॉर्म तयार करत आहे. नव्या प्लॅटफॉर्मवरुन लोकांना सेलिब्रेटी आणि कंटेट क्रिएटर्ससोबत लाईव्ह बातचीत करता येणार आहे. फेसबूककडून या प्लॅटफॉर्मला सुपर (Super) हे नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील वापरकर्ते आणि प्रेक्षक कंटेट क्रिएटर्सला डिजीटल गिफ्ट देऊ शकतात. सुपर टूलचा वापर करुन लाईव्हस्ट्रीमदरम्यान पैसे देऊन क्रिएटर्ससोबत सेल्फी काढू शकतात.(Facebook should be launch Super Video Platform soon)

फेसबूककडून या व्हिडीओ प्रॉडक्टबाबात अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मात्र, सुपर प्लटफॉर्मवरुन लाईव्हस्ट्रीममध्ये विक्रेते त्यांची उत्पादनं विकू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुपर प्लॅटफॉर्मची निर्मिती फेसबूकची एक्सपरिमेंटेशन टीम करत आहे.(Facebook should be launch Super Video Platform soon)

सुपर प्लॅटफॉर्म निर्मितीमागील कारण?

फेसबूककडून सुपर प्लॅटफॉर्म तयार करण्यामागे कोरोनाशी संबंधित कारण आहे. कोरोना काळात सेलिब्रेटी आणि त्यांचे चाहते यांना जोडण्यासाठी सुपरची निर्मिती करण्यात येणार आहे. सोमवारी फेसबूककडून Collab नावाचे एक अ‌ॅप लाँच करण्यात आले. हे अ‌ॅप टिकटॉक सारखे आहे. (Facebook should be launch Super Video Platform soon)

…तर फेसबूकला व्हाटसअ‌ॅप, इन्स्टाग्राम विकावे लागेल

सध्या फेसबूकवर एक मोठं संकट घोंगावतंय. कारण फेसबुकविरोधात अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन आणि अमेरिकेतील जवळपास प्रत्येक राज्याने खटला दाखल केला आहे. फेसबुक कंपनी या खटल्यात पराभूत झाली तर कंपनीला त्यांच्या मालकीचे Whatsapp आणि Instagram विकावं लागेल. अमेरिकन राज्यांनी फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर आरोप केला आहे की, नव्या आणि तरुण स्पर्धकांना मार्केटमधील शर्यतीपासून दूर ठेवण्यासाठी फेसबुकने ‘बाय अ‍ॅन्ड ब्यूरी’ (Buy and Bury) धोरण वापरले आहे.

या अशा प्रकारच्या खटल्यांना सामोरी जाणारी फेसबुक ही दुसरी कंपनी ठरली आहे, यापूर्वी अमेरिकेत गुगलला अशा प्रकारच्या खटल्याला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागाने ऑक्टोबर महिन्यात गुगलविरोधात दावा दाखल केला होता. 1 ट्रिलियन डॉलर इतकी व्हॅल्यू असलेल्या गुगलवर लहान प्रतिस्पर्ध्यांना मार्केटमधून हटवण्यासाठी पैसा आणि बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. (Facebook should be launch Super Video Platform soon)

संबंधित बातम्या:

एकाच वेळी 46 राज्यांचा फेसबुकविरोधात खटला, केस हरल्यास Instagram आणि Whatsapp विकावं लागेल

Google Down | 45 मिनिटं गुगलच्या सेवा ठप्प, जगभरात हाहाकार, वाचा जीवनावश्यक ठरलेल्या ‘Google’चा इतिहास!

(Facebook should be launch Super Video Platform soon)

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.