Samsung Galaxy F42 5G चे स्पेक्स-फीचर्स लीक, जाणून घ्या कसा आहे नवा 5 जी फोन

| Updated on: Sep 23, 2021 | 11:23 PM

Samsung Galaxy F42 5G Price : दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग एफ सीरीज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी F42 5G असेल.

Samsung Galaxy F42 5G चे स्पेक्स-फीचर्स लीक, जाणून घ्या कसा आहे नवा 5 जी फोन
Follow us on

Samsung Galaxy F42 5G Price : दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग एफ सीरीज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी F42 5G असेल. या आगामी स्मार्टफोनची (Samsung Galaxy F42 5G) माहिती सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर लाइव्ह झालेल्या पेजवरून मिळाली आहे. हा फोन भारतात 29 सप्टेंबरला लाँच केला जाईल. (Samsung Galaxy F42 5G smartphone ready to Launch In India)

लॉन्च डेटव्यतिरिक्त, या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि काही वैशिष्ट्ये देखील उघड झाली आहेत. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा सेट केला जाईल. त्याचबरोबर बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्याला चौरस आकारात कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन एफ सीरिजचा पहिला 5G फोन असेल.

Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने पुष्टी केली आहे की, या डिव्हाइसला फुल एचडी प्लस स्क्रीन मिळेल, जी 90 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह असेल. रीफ्रेश रेट गेमिंग अनुभव आणि स्क्रोलिंग एक्सपीरियन्स सुधारतो. मात्र, स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या आकाराबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. लीक्सनुसार, यात 6.6 इंचाचा एलसीडी पॅनल दिला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F42 5G मधील रॅम आणि प्रोसेसर

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट वापरला जाईल. हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येऊ शकतो. स्टोरेज कमी वाटल्यास वापरकर्ते मायक्रोएसडी कार्ड वापरू शकतात. लॉक केलेला स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी साइड माऊंटे़ फिंगरप्रिंट स्कॅनरही यात आहे.

Samsung Galaxy F42 5G ची बॅटरी

सॅमसंगने सांगितले आहे की, हा फोन 5000mAh बॅटरीसह सुसज्ज असेल. मात्र कंपनीने या फोनची चार्जिंग क्षमता सांगितलेली नाही. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसह सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Samsung Galaxy F42 5G smartphone ready to Launch In India)