48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung च्या किफायतशीर 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल

| Updated on: May 01, 2021 | 9:26 PM

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC आणि क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung च्या किफायतशीर 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल
Samsung Galaxy M42 5G
Follow us on

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी M42 5G (Samsung Galaxy M42 5G) स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC आणि क्वाड कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. या फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा समावेश आहे. हा सॅमसंग फोन अमेझॉन आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. (Samsung Galaxy M42 5G With Quad Rear Camera, 5,000mAh Battery, now awalable on Amazon)

हा फोन भारतात 21,999 रुपये या किंमतीसह लाँच केला आहे. या किंमतीत तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं व्हेरिएंट मिळेल. तर या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी तुम्हाला 23,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीने सुरुवातील या फोनचं 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट खरेदीसाठी उपलब्ध करुन दिलं होतं. आता 8 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज असलेले मॉडेलदेखील ग्राहक खरेदी करु शकता. आजपासून (1 मे) अमेझॉनवर तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर हे मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध होत आहे.

फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G अँड्रॉयड 11 आधारित UI 3.1 वर चालतो. यामध्ये 6.6 इंचांचा HD+ सुपर एमोलेड इन्फिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवू शकता.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. कॅमेर्‍यामध्ये, आपल्याला सिंगल टेक, नाईट मोड, हायपरलॅप्स, सुपर स्लो मोशन, सीन ऑप्टिमाइझर, फ्लो डिटेक्शन यांसारखे बरेच फीचर्स मिळतील. या फोनचा फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे.

दमदार बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 36 तासांचा टॉकटाइम, 22 तास इंटरनेट ब्राऊझिंग आणि सिंगल चार्जवर 34 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक प्रदान करतो.

इतर बातम्या

स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि आत्तापर्यंतच्या बेस्ट कॅमेरासह Mi 11 Ultra लाँच, किंमत…

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच

(Samsung Galaxy M42 5G With Quad Rear Camera, 5,000mAh Battery, now awalable on Amazon)