Samsung Galaxy Book लॅपटॉप सिरीज लाँच, 20 तासांहून अधिक बॅटरी बॅकअप

| Updated on: Sep 11, 2021 | 4:54 PM

दक्षिण कोरियन टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी बुक आणि गॅलेक्सी बुक प्रो लॅपटॉपच्या व्यावसायिक आवृत्त्या (बिजनेस एडिशन) जाहीर केल्या आहेत.

Samsung Galaxy Book लॅपटॉप सिरीज लाँच, 20 तासांहून अधिक बॅटरी बॅकअप
Follow us on

मुंबई : दक्षिण कोरियन टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी बुक आणि गॅलेक्सी बुक प्रो लॅपटॉपच्या व्यावसायिक आवृत्त्या (बिजनेस एडिशन) जाहीर केल्या आहेत. हे एडिशन दोन व्हेरिएंटसह येतात, ज्यामध्ये कोर i5, 8GB + 512GB स्टोरेज आणि कोर i7, 16GB + 256GB स्टोरेज यांचा समावेश आहे. गॅलेक्सी बुक प्रो आणि गॅलेक्सी बुक फॉर बिझनेसमध्ये विंडोज 10 प्रो आणि विंडोज 11 प्रो मध्ये अपग्रेड ऑप्शन समाविष्ट आहेत. (Samsung launches Galaxy Book laptop series with big battery backup)

दोन्ही लॅपटॉप डिव्हाइसेस इंटेलच्या 11 व्या जनरेशन प्रोसेसरवर चालतात आणि इंटेल इको सर्टिफाइड आहेत. डिस्प्लेच्या बाबतीत, दोन्ही लॅपटॉममध्ये 16:9 आस्पेक्ट रेशियोसह फुल एचडी स्क्रीन रिझोल्यूशन आहे. लॅपटॉप वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटी आणि i5 मॉडेलसाठी 21 तास आणि i7 आवृत्तीसाठी 20 तास बॅटरी लाईफ दिली आहे. गॅलेक्सी बुक थंडरबोल्ट पोर्ट, दोन यूएसबी 3.2 पोर्ट आणि यूएसबी-सी पोर्टसह सुसज्ज आहे.

सॅमसंग गॅलेक्सी बुकची किंमत किती?

गिज्मोचाइनाच्या अहवालानुसार, सॅमसंग गॅलेक्सी बुकची किंमत 15.6-इंच मॉडेल इंटेल कोर i5 प्रोसेसर आणि 16GB रॅम पॅकिंगसाठी 899 डॉलर्स इतकी आहे. त्याच वेळी, 13.3-इंच स्क्रीनसह प्रो मॉडेलची किंमत 1,099 डॉलर्सपासून सुरू होते. तर 15.6 इंचाच्या मॉडेलची किंमत 1,199 डॉलर्सपासून सुरू होते.

सॅमसंग Galaxy Tab S7 FE लाँच

सॅमसंगने या महिन्याच्या सुरुवातीला गॅलेक्सी टॅब एस 7 एफई वाय-फाय प्रकार भारतीय बाजारात लाँच केला. मॉडेल 12.4-इंच डिस्प्ले, 10,090mAh ची बॅटरी आणि Android 11 वर चालते, जसे की LTE मॉडेल. सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 7 एफई (वायफाय) 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये इतकी आहे. हे डिव्हाईस सध्या अमेझॉनवर मिस्टिक पिंक, मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक सिल्व्हर आणि मिस्टिक ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे

इतर बातम्या

Jio Phone next: जिओच्या स्मार्टफोन लाँचिंगचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकला, ‘या’ कारणामुळे लाँचिंग लांबणीवर

 त्वरा करा! आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी, आयफोन 12 वर हजारो रुपयांची सूट, काही तासांसाठीच आहे ऑफर

अवघ्या 6,999 रुपयात दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात

(Samsung launches Galaxy Book laptop series with big battery backup)