
भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A07 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. तर हा हँडसेट दोन रॅम स्टोरेज आणि तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये भारतीय बाजारातपेठेत सादर केलेला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये एक पॉवरफूल बॅटरी, एक मीडियाटेक प्रोसेसर आणि एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप समाविष्ट आहे. अशातच हा हँडसेट तुम्हाला कोणत्या किमतीत खरेदी करता येईल आणि त्याची प्रमुख फिचर्स काय आहेत? चला जाणून घेऊयात.
या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 15 हजार 999 रूपये आहे, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. तसेच 6 जीबी/128 जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 17 हजार 999 रूपये आहे. सुरुवातीच्या ऑफरचा भाग म्हणून तुम्हाला एसबीआय, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक कार्डवर 1 हजार रूपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देखील उपलब्ध होणार आहे.
सॅमसंगच्या या नवीन हँडसेटच्या या किंमतीच्या रेंजमध्ये, हा सॅमसंग ब्रँड फोन Nothing Phone 2 Pro, realme P4x 5G, MOTOROLA G96 5G आणि POCO M8 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.
स्क्रीन: या ड्युअल-सिम फोनमध्ये 6.7-इंचाचा एचडी प्लस (720×1,600पिक्सेल) आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ पर्यंत आहे आणि 800 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 ऑक्टा कोर चिपसेट आहे.
कॅमेरा सेटअप: ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 50 -मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 1080p/30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, USB Type-C पोर्ट, GPS, GLONASS आणि QZSS सपोर्ट आहे. सुरक्षिततेसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आलेला आहे.