WhatsApp ला डबल दणका, Signal च्या युजर्समध्ये 4200 टक्के वाढ, तर 72 तासात Telegram वर 2.5 कोटी नवे युजर्स

| Updated on: Jan 13, 2021 | 12:46 PM

प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपला चांगलाच फटका बसला आहे.

WhatsApp ला डबल दणका, Signal च्या युजर्समध्ये 4200 टक्के वाढ, तर 72 तासात Telegram वर 2.5 कोटी नवे युजर्स
Follow us on

मुंबई : प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपला चांगलाच फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप आणि टेलिग्राम हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अ‍ॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत सिग्नल अ‍ॅप (Signal App) टॉपवर आहेत. तसेच अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्स टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत आहेत. (Signal app downloads skyrocketed 4,200% after WhatsApp forced users to share personal data)

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या गोपनीयता धोरणाबाबत आतापर्यंत दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तसेच युजर्सचा डेटा कोणासोबतच शेअर केला जाणार नसून सर्व डेटा सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण देऊन व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने लोक व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन सिग्नल किंवा टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत आहेत. त्यामुळे या महिन्यात नव्याने अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप पिछाडीवर आहे. तर सिग्नल आणि टेलिग्राम या दोन अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे. कारण सिग्नल आणि टेलिग्रामवरील युजर्स सातत्याने वाढत आहेत.

अ‍ॅप अ‍ॅनालिटिक फर्म सेंसर टॉवरच्या रिपोर्टनुसार सिग्नल अ‍ॅपवरील युजर्स सातत्याने वाढत आहेत. 6 जानेवारी ते 10 जानेवारी या पाच दिवसात अ‍ॅपस्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरुन 7.5 मिलियन युजर्सनी सिग्नल अ‍ॅप इन्स्टॉल केलं आहे. ही आकडेवारी मागील आठवड्यातील डाऊलोड्सपेक्षा 4 हजार 200 टक्के अधिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपला होत असलेल्या विरोधाचा टेलिग्राम या अ‍ॅपलाही फायदा झाला आहे. त्यामुळे अनेक युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅपऐवजी टेलिग्रामला प्राधान्य दिलं आहे. या एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्विसने 6 ते 10 जानेवारीदरम्यान केवळ पाच दिवसांमध्ये 9 मिलियन नवे युजर्स मिळवले आहेत. ही आकडेवारी गेल्या आठवड्यातील डाऊनलोडिंगपेक्षा 91 ट्के अधिक आहे.

सिग्नल आणि टेलिग्राम या दोन्ही अ‍ॅप्ससाठी भारत हे सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात 2.3 मिलियन युजर्सनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. तर टेलिग्रामला 25 मिलियन नवे भारतीय युजर्स मिळाले आहेत. सिग्नल अ‍ॅपसाठी अमेरिका हे दुसरं सर्वात मोठं मार्केट ठरलं आहे. 1 मिलियन अमेरिकन युजर्सनी सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे.

एलॉन मस्कच्या ट्विटनंतर सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅपच्या नव्या घोषणेनंतर सांगितलं की, सिग्नल अॅप हा सुरक्षित असल्यानं त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. ते स्वतःदेखील हेच अॅप वापरत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. मस्क यांच्या ट्वीटमुळे ते स्वतः हे अॅप वापरत असल्याच्या बातमीमुळे सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केलं जात आहे.

संबंधित बातम्या

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

(Signal app downloads skyrocketed 4,200% after WhatsApp forced users to share personal data)