व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

व्हाटसअ‌ॅप ग्रुपवरील मेसेज गुगलवर दिसत आहेत. गुगलवर एखाद्या व्यक्तीनं WhatsApp Group सर्च केल्यास चॅटिंग वाचता येत आहे. WhatsApp messages leak google

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

नवी दिल्ली: नव्या गोपनीयता धोरणांमुळे चर्चेत असणारे व्हाटसअ‌ॅप आणखी एका वादात सापडलं आहे. व्हाटसअ‌ॅप ग्रुपवरील मेसेज गुगलवर दिसत आहेत. गुगलवर एखाद्या व्यक्तीनं WhatsApp Group सर्च केल्यास चॅटिंग वाचता येत आहे. तसेच त्या लिंकवरुन वैयक्तिक ग्रुपदेखील जॉईन करता येत आहेत. व्हाटसअ‌ॅपच्या चुकीमुळे व्हाटसअ‌ॅप ग्रुपमधील नंबर सार्वजनिक झाले आहेत.मागील वर्षी देखील व्हाटसअ‌ॅप मेसेज गुगलवर दिसत होते. व्हाटसअ‌ॅपकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आली आहे. (WhatsApp private groups messages leak on Google once again and issue resolved)

2019 मध्येही बिघाड

नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp मध्ये 2019 मध्येही तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे काही प्रायव्हेट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप गूगलच्या सर्चमध्ये दिसले होते. त्यानंतर व्हाटसअ‌ॅपनं ही त्रुटी दुरुस्त करण्यात आली होती. व्हाटसअ‌ॅपमधील या त्रुटीविषयी राजशेखर राजहरियांनी याबाबत माहिती दिली होती. 2019 मध्ये गुगल सर्चमध्ये 1500 व्हाटसअ‌ॅप ग्रुपच्या लिंक आल्या होत्या.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

व्हाटसअ‌ॅपची भूमिका काय?

डाटा, मेसेज आणि ग्रुप इनवाईट लिंक गुगलसर्च आल्याविषयी व्हाटसअ‌ॅपनं भूमिका स्पष्टकेली आहे. मार्च 2020 नंतर व्हाटसअ‌ॅपशी संबंधित लिंक असणाऱ्या पेजेसला noindex टॅग लागू केला असल्याचं सांगितले होते. व्हाटसअ‌ॅपकडून दरवेळी डाटा लीकवर स्पष्टीकरण देण्यात येते. मात्र, सद्याच्या नव्या गोपनीयता धोरणामुळे व्हाटसअ‌ॅपचे वापकर्ते सिग्नल आणि टेलीग्रामवर शिफ्ट होत असल्याचं चित्र आहे.

WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती

दरम्यान, नुकतंच WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती आणल्या आहेत.त्या अटी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल.

संबंधित बातम्या:

व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यापूर्वी ‘या’ सवयींना आळा घाला, अन्यथा….

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

(WhatsApp private groups messages leak on Google once again and issue resolved)

Published On - 4:31 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI