AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Helmet : उन्हाळ्यात डोक्याला थंड ठेवणारे स्मार्ट हेलमेट, किती आहे किंमत

हेल्मेटचे वैशिष्ट्य म्हणजे एअरफ्लो व्हेंटिलेशन सिस्टीम जे रायडरला हेल्मेटच्या आत आरामदायी हवा मिळेल याची खात्री देते. तसेच, चांगल्या संरक्षणासाठी त्यात थर्मोप्लास्टिक शेल आहे.

Smart Helmet : उन्हाळ्यात डोक्याला थंड ठेवणारे स्मार्ट हेलमेट, किती आहे किंमत
विना हेलमेट बाईक चालवणाऱ्या पतीला चलन, पत्नीची घटस्फोटाची मागणीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 17, 2023 | 9:35 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रासह अनेक भागात उष्णतेचा प्रकोप सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत हेल्मेट घालून दुचाकी चालवणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे.   उन्हाळ्यात दुचाकीस्वारांना कराव्या लागणाऱ्या समस्यांचे समाधान आता मिळाले आहे. हेल्मेट (Smart Helmet) उत्पादक स्टीलबर्डने डोके थंड ठेवण्यासाठी SBA 19 R2K फ्लिप-अप हेल्मेट लॉन्च केले आहे. स्टीलबर्डचे नवीन हेल्मेट बीआयएस प्रमाणित आहे आणि त्याची किंमत फक्त 1199 रुपये आहे. कंपनीला विश्वास आहे की स्टीलबर्डचे नवीन फ्लिप-अप हेल्मेट बाजारात गेम चेंजर ठरणार आहे.

आरामदायक आणि सुरक्षित!

स्टीलबर्ड SBA 19 R2K फ्लिप-अप हेल्मेटचे वैशिष्ट्य म्हणजे एअरफ्लो व्हेंटिलेशन सिस्टीम जे रायडरला हेल्मेटच्या आत आरामदायी हवा मिळेल याची खात्री देते. तसेच, चांगल्या संरक्षणासाठी त्यात थर्मोप्लास्टिक शेल आहे. कन्व्हर्टेबल स्टायलिश इंटीरियर्स रायडरचा प्रवास आरामदायी बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. हेल्मेटमध्ये उच्च घनता EPS आहे, ज्यामुळे प्रभाव प्रतिकार क्षमता वाढते. हेल्मेटमध्ये पॉली कार्बोनेट अँटी-स्क्रॅच कोटेड व्हिझर आहे. हे हेल्मेट नाक गार्डसह देखील येते.

3 आकारात उपलब्ध

स्टीलबर्ड SBA 19 R2K फ्लिप-अप हेल्मेट 3 आकारात मध्यम 580 मिमी, मोठ्या 600 मिमी आणि XL 620 मिमी मध्ये उपलब्ध आहे. स्टीलबर्ड हेल्मेटचे एमडी राजीव कपूर म्हणतात, “SBA19 फ्लिप-अप हेल्मेट खास उन्हाळ्यासाठी डिझाइन केलेले आहे. हेल्मेट परवडण्याजोगे तर आहेच पण त्यामध्ये अधिक चांगली आणि आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. त्याची एअरफ्लो व्हेंटिलेशन सिस्टम, नोज प्रोटेक्टर आणि फ्लिप-अप वैशिष्ट्ये रायडर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामासाठी आहेत. हे हेल्मेट स्टीलबर्ड हाय-टेक इंडिया लिमिटेड डीलरशिपवर आणि www.steelbirdhelmet.com वर ऑनलाइन उपलब्ध आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?