Facebook अकाउंट हटवायचंय कायमचं? हे स्टेप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील

तुम्ही Facebook पासून केवळ ब्रेक किंवा पूर्णपणे डिजिटल शांती घ्यायचा विचार करत असाल, तर हा योग्य पर्याय आहे. पण पर्याय निवडण्याआधी या दिलेल्या स्टेप्स आणि महत्त्वाच्या गोष्टी नक्की फॉलो करा.

Facebook अकाउंट हटवायचंय कायमचं? हे स्टेप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 2:02 PM

आजकाल अनेकजण सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे मानसिक थकवा, डेटा सिक्युरिटीची चिंता आणि डिजिटल शांतीची गरज अनुभवत आहेत. विशेषतः Facebook सारखे अ‍ॅप्स जे सतत अपडेट्स, नोटिफिकेशन्स आणि न संपणाऱ्या पोस्ट्सचा मारा करतात ते अनेकदा “डिजिटल डिटॉक्स” साठी पहिलं लक्ष्य बनतात. अशा वेळी यूजरकडे दोन पर्याय असतात Facebook अकाउंट टेम्पररी डीअ‍ॅक्टिवेट करणं किंवा पूर्णपणे डिलीट करणं.

पण या दोघांमध्ये नेमकं काय फरक आहे आणि कोणता ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे? चला, समजून घेऊया आणि जाणून घेऊया अकाउंट डीअ‍ॅक्टिवेट किंवा डिलीट करण्याची स्टेप-बाय-स्टेप माहिती.

डीअ‍ॅक्टिवेशन आणि डिलीशन यामध्ये काय फरक आहे?

डीअ‍ॅक्टिवेशन (तात्पुरता ब्रेक):

तुमचं प्रोफाइल आणि पोस्ट्स इतरांना दिसणार नाहीत.

डेटा सुरक्षित राहतो.

Messenger वापरता येतो.

कधीही पुन्हा लॉग इन करून परत येऊ शकता.

डिलीशन (कायमची एक्झिट):

प्रोफाइल, पोस्ट्स, फोटो, कमेंट्स सर्व 30 दिवसांनंतर कायमचे डिलीट होतात.

एकदा 30 दिवस पूर्ण झाले की मग काहीही रिकव्हर करता येत नाही.

Facebook अकाउंट कसं डीअ‍ॅक्टिवेट करायचं?

* Facebook अ‍ॅप किंवा वेबसाइट उघडा आणि लॉग इन करा.

* Menu (तीन रेषा) किंवा डेस्कटॉपवर टॉप-राइट कोपऱ्यात असलेल्या अ‍ॅरोवर क्लिक करा.

* Settings & Privacy > Settings वर जा.

* Accounts Center > Personal Details > Account Ownership and Control निवडा.

* Deactivation or Deletion ऑप्शनवर क्लिक करा.

* Deactivate Account निवडा (जर एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर योग्य अकाउंट निवडा).

* कारण विचारल्यास निवडा आणि पुढे ‘Continue’ वर टॅप करा.

* शेवटी ‘Deactivate’ वर क्लिक करा.

टीप: Messenger वापरण्यासाठी तो वेगळा डीअ‍ॅक्टिवेट करावा लागतो.

Facebook अकाउंट परमनंट डिलीट कसं करायचं?

* Facebook मध्ये लॉग इन करा.

* Settings & Privacy > Settings वर क्लिक करा.

* Accounts Center > Personal Details > Account Ownership and Control वर जा.

* Deactivation or Deletion > Delete Account निवडा.

* आवश्यक असल्यास योग्य अकाउंट निवडा आणि ‘Continue’ वर क्लिक करा.

* Confirm करा आणि Facebook डिलीशन प्रोसेस सुरू करेल.

महत्त्वाचं: डिलीट रिक्वेस्टनंतर Facebook तुम्हाला 30 दिवसांचा विचार करण्याचा वेळ देतो. या कालावधीत तुम्ही परत लॉग इन केल्यास डिलीशन कॅन्सल होऊ शकतो. 30 दिवसांनंतर मात्र सगळं कायमचं मिटवून टाकलं जातं.

डिलीट करण्याआधी लक्षात ठेवायच्या गोष्टी

डेटा डाऊनलोड करा: तुम्हाला फोटो, व्हिडिओ, पोस्ट्स सेव्ह करून ठेवायचे असतील, तर आधी Settings > Your Facebook Information > Download Your Information वर जाऊन सगळा डेटा सेव्ह करा.